कुणालच्या प्रस्तावाला सोहानं दिला होकार!

बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेता सैफ अली खान याची छोटी बहिण सोहा अली खान आता लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी तयार आहे.

Updated: Jul 24, 2014, 11:04 AM IST
कुणालच्या प्रस्तावाला सोहानं दिला होकार! title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेता सैफ अली खान याची छोटी बहिण सोहा अली खान आता लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी तयार आहे.

सोहा आणि अभिनेता कुणाल खेमू यांच्यातील गेल्या काही काळापासून सुरु असलेले प्रेम संबंध आता विवाहाच्या टप्प्यात येऊन ठेपलेत. याची जाहीर कबुली खुद्द सोहानंच दिलीय. 

दीर्घकाळ चाललेल्या डेटिंगनंतर कुणालनं अखेर सोहाला विवाहासाठी प्रपोज केलंय... आणि आनंदाची गोष्ट म्हणजे सोहानंही कुणालचा हा प्रस्ताव स्वीकार केलाय.  

‘तुम्हा सगळ्यांना सांगायला मला आनंद होतोय की, कुणालनं मला पॅरिसमध्ये प्रपोज केलंय. त्यानं मला जगातील सर्वात सुंदर अंगठी घालून विवाहाचा प्रस्ताव समोर ठेवलाय... आणि मी तो स्वीकार केलाय’ असं ट्विट सोहानं केलंय. 

सोहा आणि कुणालच्या वयात जवळपास पाच वर्षांचं अंतर आहे. कुणाल सोहाहून पाच वर्षांनी लहान आहे. 

या ट्विटवर सोहाची जवळची मैत्रिण नेहा धुपिया हिनं प्रतिक्रिया देत सोहाला शुभेच्छाही दिल्यात. ‘क्या बात है! ही आत्तापर्यंतची सर्वात चांगली बातमी आहे. शुभेच्छा, आता तुम्ही दोघंही लवकर परत या, कुणाल तू खूप भाग्यवान आहेस’, असं नेहानं म्हटलंय. 

हिंदी सिनेमांत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी सोहाची आई शर्मिला टागोर यांची आपल्या मुलीला बोहल्यावर चढताना पाहण्याची  इच्छा लवकरच पूर्ण होणार, असं दिसतंय. 

सोहानं बोटांवर मोजण्याइतक्याच सिनेमांत भूमिका केल्यात. परंतु, रंग दे बसंती, साहेब बीवी और गँगस्ट रिटर्न्स तसंच मुंबई मेरी जान यांसारख्या वेगळ्या धाटणीच्या हिंदी सिनेमांमध्ये काम करून तिनं आपली वेगळी अशी ओळख निर्माण केलीय.
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.