मुलाखत सनी लिऑनची, पण चर्चा मुलाखत घेणाऱ्याची

सनी लिऑन कायम चर्चेत असते. पण यावेळी मात्र सनीची मुलाखत घेणारा मुलाखतकार चर्चेत आलाय.

Updated: Jan 20, 2016, 06:39 PM IST
मुलाखत सनी लिऑनची, पण चर्चा मुलाखत घेणाऱ्याची title=

मुंबई : आपल्या बोल्ड आणि हॉट लूकमुळे सनी लिओनी कायम चर्चेत असते. पण यावेळी मात्र सनीची मुलाखत घेणारा मुलाखतकार चर्चेत आलाय.

सीएनएन आयबीएन चॅनलचे पत्रकार भुपेंद्र चौबे यांनी सनीच्या आगामी मस्तीजादे सिनेमाच्या प्रमोशनसाठी मुलाखत घेतली. पण या मुलाखतीदरम्यान भुपेंद्र यांनी सनीला वादग्रस्त प्रश्न विचारले. ज्यात सनीच्या भूतकाळाबाबत वारंवार उल्लेख करण्यात आला.  त्यावरुनच आता भुपेंद्र चौबे यांच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका होतेये. 

तुझ्या भूतकाळाबद्दल तुला अभिमान आहे का ? आमिर खान तुझ्याबरोबर काम करेल का ? बॉलीवूडच्या भाषेत तू आयटम गर्ल आहेस, किती जणांना पॉर्नस्टार होण्याची इच्छा असते? असे वादग्रस्त प्रश्न चौबेंनी सनीला विचारले.

सनीच्या नवराही संतापला  

सनी लिऑनचा नवरा डॅनिअल वेबर यानंही भुपेंद्र चौबे यांना लक्ष्य केलंय. सनी लिओनीच्या त्या मुलाखतीबाबत मला माहिती मिळाली, मी जर सनीच्या ठिकाणी असतो, तर मुलाखत अर्धवट सोडून निघालो असतो, अशी प्रतिक्रिया वेबरनं दिलीये.

 भुपेंद्र चौबे यांची नैतिकतेवरही वेबरनं टीका केलीये. त्याचवेळी सनीनं मुलाखतीवेळी खिलाडू वृत्ती दाखवली पण तिला ही याबाबत दु:ख झाल्याचं सनीचा नवरा म्हणालाय. हा वाद सनीच्या मस्तीजादे सिनेमाच्या प्रमोशनसाठी ओढावून घेतल्याचं वृत्त मात्र वेबरनं फेटाळलंय.