सनी लिओनी आता नव्या भूमिकेत

आधी पॉर्न इंडस्ट्री मग बॉलीवूडमध्ये काम केलेली अभिनेत्री सनी लिओनी आता आपल्याला नव्या भूमिकेमध्ये दिसणार आहे.

Updated: Apr 23, 2016, 09:03 PM IST
सनी लिओनी आता नव्या भूमिकेत title=

मुंबई: आधी पॉर्न इंडस्ट्री मग बॉलीवूडमध्ये काम केलेली अभिनेत्री सनी लिओनी आता आपल्याला नव्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. सनी लिओनीनं स्वीट ड्रीम्स नावाचं पुस्तक लिहीलं आहे. या पुस्तकामध्ये 12 लहान गोष्टी आहेत.

पुस्तक लिहायचा मी कधीही विचार केला नव्हता, आयुष्यामध्ये पहिल्यांदाच मी लिखाण केलं आहे, अशी प्रतिक्रिया सनीनं दिली आहे. लहान असताना मी डायरी लिहायचे पण जेव्हा आईनं ही डायरी पाहिली तेव्हा मी तेही लिहीणं सोडून दिल्याचं सनी म्हणाली. 3 महिन्यांमध्ये आपण हे पुस्तक लिहीलं असल्याचं वक्तव्य सनीनं केलं आहे.