काय सांगता! सात तासांचा ट्रेलर, एका महिन्याचा सिनेमा

तुम्ही आजवर अनेक सिनेमांचे ट्रेलर पाहिले असतील... जास्तीत जास्त ३ ते ४ मिनिटांचे हे व्हिडिओ ट्रेलर असतील... पण, आता मात्र एक असा सिनेमा येतोय ज्याचा केवळ ट्रेलरच सात तासांचा आहे. 

Updated: Apr 23, 2016, 04:02 PM IST
काय सांगता! सात तासांचा ट्रेलर, एका महिन्याचा सिनेमा title=

मुंबई : तुम्ही आजवर अनेक सिनेमांचे ट्रेलर पाहिले असतील... जास्तीत जास्त ३ ते ४ मिनिटांचे हे व्हिडिओ ट्रेलर असतील... पण, आता मात्र एक असा सिनेमा येतोय ज्याचा केवळ ट्रेलरच सात तासांचा आहे. 

७२० तासांचा सिनेमा

ज्या सिनेमाचा ट्रेलर सात तासांचा असेल... तो सिनेमा किती तासांचा असेल असा साहजिकच प्रश्न तुम्हाला पडला असेल? हा हॉलिवूड सिनेमा तब्बल एका महिन्याचा असेल. 

या संपूर्ण सिनेमा तब्बल ७२० (२४x३०=७२०) तासांचा असणार आहे, असा दावा करण्यात येतोय. हा आजवरचा जगातील सर्वात जास्त वेळेचा सिनेमा असेल. 

टिझर ७२ मिनिटांचा

हा सिनेमा स्वीडनचा डायरेक्टर आंद्रेस वेबर्ग दिग्दर्शत करत आहे. या सिनेमाचा एक छोटा टिझर गेल्या वर्षी प्रदर्शित करण्यात आला होता. हा टिझर ७२ मिनिटांचा होता... आता २०१८ मध्ये या सिनेमाचा सात तासांचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.  

सिंगल शॉट सिनेमा 

खरी गंमत तर पुढेच आहे... हा सिनेमा सिंगल शॉटमध्ये तयरा करण्यात आलाय. यामध्ये कोणताही कट नाही. हा सिनेमा डिसेंबर २०२० मध्ये प्रदर्शित होणार असा अंदाज बांधला जातोय.