'लय भारी'त सलमान खानची मऱ्हाटी स्टाईल!

 सध्या बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान 'किक'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. एवढंच नाही तर तो रितेश देशमुखचा आगामी मराठी सिनेमा 'लय भारी'मध्येही भूमिका करताना दिसणार आहे. हा सिनेमा रितेशचा पहिला मराठी डेब्यू सिनेमा असणार आहे. तसेच सलमान खानचाही हा पहिला मराठी डेब्यू सिनेमा असणार आहे. 

Updated: Jul 7, 2014, 08:42 PM IST
'लय भारी'त सलमान खानची मऱ्हाटी स्टाईल!   title=
फाईल फोटो

मुंबई:  सध्या बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान 'किक'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. एवढंच नाही तर तो रितेश देशमुखचा आगामी मराठी सिनेमा 'लय भारी'मध्येही भूमिका करताना दिसणार आहे. हा सिनेमा रितेशचा पहिला मराठी डेब्यू सिनेमा असणार आहे. तसेच सलमान खानचाही हा पहिला मराठी डेब्यू सिनेमा असणार आहे. 

मराठी चित्रपट 'लय भारी'मध्ये सलमान दारूड्या व्यक्तीच्या भूमिकेत मराठीत बोलताना दिसणार आहे.  

सलमाननं ट्विटरवर त्याचा लुक शेअर केलाय.

 

https://t.co/nqKkvDtE4b

— Salman Khan (@BeingSalmanKhan) July 7, 2014

अलिकडेच रितेश देशमुखने सलमान खाननं या सिनेमात 'कॅमियो' केल्याबद्दल आभार मानले आहेत. येत्या ११ जुलैला 'लय भारी' सिनेमा रिलीज होणार आहे. 

लय भारी सिनेमा नॅशनल अॅवॉर्ड विजेता निशिकांत कामतने दिग्दर्शित केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सलमानने खूप शॉर्ट नोटीसवर सिनेमा करण्यासाठी होकार दिलाय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.