नवी दिल्ली : नुकतंच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी संसदेत रेल्वे अर्थसंकल्प २०१६-१७ सादर केला. हा अर्थसंकल्प सादर करण्याअगोदर बीग बी अमिताभ बच्चन यांना फोन केला होता. ही गोष्ट स्वत: बीग बी यांनीच उघड केलीय.
रेल्वे बजेट सादर करण्याच्या सुरुवातीला प्रभू यांनी हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेच्या काहीही वाचल्या होत्या. याचीच परवानगी मागण्यासाठी प्रभू यांनी स्वत: अमिताभ बच्चन यांना फोन केला होता.
इतकंच नाही तर सुरेश प्रभू यांनी बजेट संपल्यानंतर आपण या ओळी योग्य पद्धतीनं म्हटल्या का? याची खात्री करून घेण्यासाठी पुन्हा बीग बींना फोन केला.
जितका साधेपणा आणि सभ्यपणा सुरेश प्रभू यांनी दाखवला तितकीच नम्रता बीग बींनी दाखवत याबद्दल प्रभूंमध्ये गौरवशाली संस्कृतीची झलक पाहायला मिळाल्याचं म्हटलंय.
नव उमंग, नव तरंग,
जीवन का नव प्रसंग
नवल चाह, नवल राह,
जीवन का नव प्रवाह।
FB 1258 - The Hon Railways Minister, Shri Suresh Prabhu quoted my Father's poem in his Rail Budget presentation in the...
Posted by Amitabh Bachchan on Saturday, February 27, 2016