'तारक मेहता...' मध्ये आता हा कलाकार दिसणार नाही...

गेल्या नऊ वर्षांपासून प्रसिद्ध असलेल्या तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील एक मुख्य कलाकार शोला अलविदा करण्याच्या तयारीत आहे. आम्ही बोलतोय ते जेठालाल(दिलीप जोशी) आणि दया भाभी(दिशा वाकाणी) यांचा मुलगा टप्पूबद्दल. 

Updated: Feb 10, 2017, 12:06 PM IST
'तारक मेहता...' मध्ये आता हा कलाकार दिसणार नाही... title=

मुंबई : गेल्या नऊ वर्षांपासून प्रसिद्ध असलेल्या तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील एक मुख्य कलाकार शोला अलविदा करण्याच्या तयारीत आहे. आम्ही बोलतोय ते जेठालाल(दिलीप जोशी) आणि दया भाभी(दिशा वाकाणी) यांचा मुलगा टप्पूबद्दल. 

बॉलीवूड भास्करच्या बातमीनुसार, भव्य गांधी हा शो सोडणार असल्याची रिपोर्ट्सची माहिती आहे. भव्यला गुजराती सिनेमाची ऑफर मिळाली असल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, या माहितीला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. 

सब टीव्ही चॅनेलवर गेल्या ९ वर्षाहून अधिक काळ ही मालिका सुरु आहे. अद्यापही या मालिकेचा मोठा प्रेक्षक वर्ग आहे.