प्रत्युषा- राहुल यांच्यातील शेवटचे ३ मिनिटं २१ सेकंदाचे संभाषण

 प्रत्युषाच्या आत्महत्येचे प्रकरण दिवसेंदिवस खूप  गुंतागुंतीचे होत आहे. प्रत्येक वेळी प्रकरणाबद्दल काही नवीन अपडेट मिळत आहे, तसे पुरावे बॉयफ्रेंड राहुल राज सिंग याच्या विरोधात जात आहेत. 

Updated: Apr 27, 2016, 11:28 PM IST
प्रत्युषा- राहुल यांच्यातील शेवटचे ३ मिनिटं २१ सेकंदाचे संभाषण title=

मुंबई :  प्रत्युषाच्या आत्महत्येचे प्रकरण दिवसेंदिवस खूप  गुंतागुंतीचे होत आहे. प्रत्येक वेळी प्रकरणाबद्दल काही नवीन अपडेट मिळत आहे, तसे पुरावे बॉयफ्रेंड राहुल राज सिंग याच्या विरोधात जात आहेत. 

प्रत्युषाने केला एकच फोन...

प्रत्युषाने ज्या दिवशी १ एप्रिलला आत्महत्या केली तेव्हा तीने राहुलला संपूर्ण दिवसात केवळ एकच कॉल केला होता. 

ऑडीओ टेपमध्ये काय...

या दोघांच्या संभाषणाची एक ऑडिओ टेप आहे त्यात या गोष्टी समोर आल्या आहेत. या फोन कॉलमध्ये प्रत्युषा रडत होती ती राहुलवर ओरडत होती. ती त्याला चिटर म्हणत होती तसेच आई वडिलांपासून तोडल्याचा आरोप करत होती. 

हा कॉल सुमारे ३ मिनिटे आणि २१ सेकंद चालला होता. तसेच या कॉलमध्ये ती असं काहीतरी वाईट करणार याची हिंटही राहुल राज सिंगला दिली होती..

प्रत्युषा काय म्हणाली...

तसेच या संदर्भात नवीन आलेल्या माहितीनुसार प्रत्युषाने राहुलवर आरोप लावले की माझे आयुष्य उद्धवस्त केले. एका वृत्तपत्राने दिलेल्या संभाषणाच्या संपूर्ण माहितीनुसार प्रत्युषा राहुलला म्हणाली, मला कॅरेक्टर लेस म्हटले जात आहे. मला मारण्याची धमकी दिली जात आहे. माझ्या आई वडिलांना मारण्याची धमकी दिली जात आहे. आता उरलं काय आहे माझ्या आयुष्यात... 

राहुल काय म्हणाला.... 

या सर्व छोट्या गोष्टी आहे. 

प्रत्युषा...

राहुलच्या प्रतिक्रियेनंतर ती म्हणाली. ही छोटी गोष्ट असल्याचं तुम्ही कसं म्हणू शकतात. मि. राहुल तुमचा इगो जरा बाजुला ठेवा.