मुंबई : आज बिग स्क्रिनवर दोन मराठी आपल्या भेटीला आलेत. झीस्टुडिओज आणि सतीश राजवाडे यांचा 'ती सध्या काय करते' हा सिनेमा आज प्रदर्शित झालाय, तर दिलीप प्रभावळकर, भाऊ कदम, संजय खापरे आदी कलाकारांची भूमिका असलेला 'झाला बोभाटा' हा सिनेमाही आज रिलीज झालाय.
आयुष्यात आपण प्रत्येकजण कधी न कधी कोणाच्यातरी प्रेमात पडतो. हे खरंय, त्या पहिल्या प्रेमाची आठवण, ते क्षण, ते प्रेम, त्या प्रेमाच्या गोष्टी आपण कधाही विसरु शकत नाही. ती सध्या काय करते, किंवा तो सध्या काय करतो हा प्रश्न आपल्याला अनेकदा पडत असतो. याच पहिल्या प्रेमाची पुन्हा एकदा आठवण करुन देण्यासाठी झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक सतिश राजवाडे घेउन आलेत 'ती सध्या काय करते' हा सिनेमा. हा सिनेमा आज बिग स्क्रिनवर झळकलाय. अभिनेता अंकुश चौधरी, तेजश्री प्रधान, अभिनय बेर्डे या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसतायेत, कसा आहे ती सध्या काय करते? हा सिनेमा तुमचे पैसे वसूल करणार का? काय आहे या सिनेमाची ट्रु स्टोरी..घ्या जाणून
सतीश राजवाडे यांनी आजवर अनेक लव्ह स्टोरीस आपल्याला दिलेत. मुंबई पुणे मुंबई, प्रेमाची गोष्ट सारखे रोमॅन्टीक सिनेमे देणा-या सतिश राजवाडेनीच हा सिनेमा दिग्दर्शित कोलाय. अनुराग आणि तन्वी या दोघांची ही गोष्ट. अनुराग आणि तन्वीचं अगदी कमी वयापासूनच या दोघांचं एकमेकांवर प्रेम असतं, एकमेकांबाबत आकर्षण असतं. पण कधीच हे प्रेम ते एकमेकांकडे व्यक्त करत नाही. काही कारणांनी तन्वी एक दिवस अचानक दिल्लीला निघून जाते. न कळवता दिल्लीला निघून गेल्याने अनुरागला प्रचंड दुख होतं. या दोघांचं हे पहिलं प्रेम त्याबाबतचं कन्फेशन अपुर्णच राहून जातं. पुढे अनुराग आणि तन्वी या दोघांचंही लग्न होतं पण वेगवेगळ्या व्यक्तींसोबत. तन्वी अमोरीकेत सेटल होते तर अनुराग मुंबईत. ते दोघंही आपआपल्या कुटुंबासोबत अगदी सुखात नांदत असतात. मग फायनली एक दिवस अनुराग आणि तन्वीची भेट होते. पण या वेळी मात्र सगळं काही बदललेलं असतं, परिस्थिती बदललेली असते... हे दोघं इतक्या वर्षांनी जेव्हा परत भेटतात, तेव्हा काय घडतं.. या साठी तुम्हाला सिनेमा पहावाच लागेल..
दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी ही गोष्ट खूपच वेगळ्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केलाय. कारण कधी ही गोष्ट फ्लॅशबॅकमध्ये जाते तर कधी पुन्हा वर्तमानात येते. त्यामुळे त्याची मांडणी, त्याचे सादरीकरण आणि संपूर्ण ट्रीटमेन्ट या सगळ्या गोष्ट दिग्दर्शक कसा हॅन्डल करतो हे या सिनेमाच्या कथानकाच्यबाबतीत महत्वाचं ठरतं.
याचं एक्झिक्युशन सतिशनं छान पार पाडलंय, अजिबात कुठेतरी कुठल्याही प्रकारचं संभ्रम उपस्थित न करता. 'ती सध्या काय करते' या सिनेमाची गोष्ट छान आहे, मात्र ती लेखकाला आणखी छान रंगवता आली असती. सिनेमाची ओवरऑल गोष्ट पाहता, प्रॅक्टिकल आयुष्यात कदाचित १० पैकी एखाद दोन केस मध्येत असं घडत असावं, त्यामुळे हा पाहताना, किंवा आपआपल्या पहिल्या प्रेमाशी हा सिनेमा रिलेट करताना, सिनेमाच्या कथेमुळे प्रेक्षकांनाही थोडंसं कठीण जाउ शकतं, ही शक्यता नाकारता येत नाही.
अभिनेता अंकुश चौधरी, तेजश्री प्रधान, अभिनय बेर्डे, आर्या आंबेकर, सरप्राईज पॅकेजमध्ये दिसणारी उर्मीला कानिटकर कोठारे, या सगळ्या कलाकारांनी आपआपल्या व्यक्तिरेखा छान रंगवल्या आहेत. दिवंगत अभिनेता लक्षमीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डेचा हा पहिला सिनेमा, त्याचं दिसणं, वावरणं, त्याचा अभिनय आणि एकुणच स्क्रिन प्रेसेन्स छान झालाय. गायिका अभिनेत्री आर्या आंबेकरला मात्र अभिनयात आणखी प्रशिक्षणाची गरज आहे, असं जाणवतं.
सिनेमाचं संगीत ठिठठाक झालंय. हृदयात वाजे समथीन्ग हे गाणं श्रवणीय वाटतं. सिनेमाची सिनेमाटोग्राफी छान झालीये. कलाकारांचे कॉस्चुम्स आणि लोकेशन्सही सुंदर आहेत. ती सध्या काय करते हा एक फॅमिली एंटरटेनर सिनेमा आहे. या सिनेमातले हे सगळे फॅक्टर्स पाहता मी या सिनेमाला देतेय २.५ स्टार्स.