टिस्का चोपडाही सापडली होती कास्टिंग काऊचच्या तावडीत

फिल्मइंडस्ट्रीच्या लखलखत्या दुनियेचं आकर्षण प्रत्येकाला असतं. पण या क्षेत्राचं खरं रूप त्यांनाच दिसतं जे या क्षेत्रात काम करतात. इथला संघर्ष आणि इथले धोके यांचा सामना करत ही मंडळी मोठी होतात.

Updated: Aug 11, 2016, 01:34 PM IST
टिस्का चोपडाही सापडली होती कास्टिंग काऊचच्या तावडीत title=

मुंबई : फिल्मइंडस्ट्रीच्या लखलखत्या दुनियेचं आकर्षण प्रत्येकाला असतं. पण या क्षेत्राचं खरं रूप त्यांनाच दिसतं जे या क्षेत्रात काम करतात. इथला संघर्ष आणि इथले धोके यांचा सामना करत ही मंडळी मोठी होतात.

काहीवेळा कामाच्या शोधात वाट चुकून काही कलाकार 'कास्टिंग काऊच'च्या तावडीतही सापडतात. असाच एक अनुभव अभिनेत्री टिस्का चोपडा हिलाही आला होता.

टिस्काचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतोय. यात तिने आपल्याला आलेला कास्टींग काऊचचा अनुभव चाहत्यांशी हसतखेळत शेअर केलाय.

त्यावेळी टिस्काची पहिली फिल्म रिलीज झाली होती. त्यानंतर ती पुढील कामाच्या शोधात होती. अचानक एक दिवस तिला एक फोन आला. यात तिला एका फिल्मची ऑफर देण्यात आली. टिस्काने ती फिल्म करण्याचा निर्णय घेतला.काही दिवस शूट व्यवस्थित पार पडलं. पण त्यानंतर तिला एक विचित्र अनुभव आला. या घटनेतून तिने स्वतःला हुशारीने बाहेर काढलं.
   
तिचा अनुभव कथनाचा हा व्हिडिओ यू ट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आला. तेव्हापासून तो 'रेप्टाइल डिस्फक्शन' नावाने व्हायरल होतोय. व्हिडिओ व्हायरल केल्याबद्दल टिस्कानेही ट्विट करून आभार मानले  आहेत.
   
'दिल तो बच्चा है जी' आणि 'तारे जमीं पर' या सिनेमांमध्ये टिस्काने काम केलं आहे.