व्हिडिओ : 'अग्ली'चा ट्रेलर प्रेक्षकांसमोर

 सिने-निर्माता अनुराग कश्यप याच्या ‘अग्ली’ या सिनेमाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. हा सिनेमा एक सायकोलॉजिकल थ्रिलर आहे.

Updated: Jul 22, 2014, 01:54 PM IST
व्हिडिओ : 'अग्ली'चा ट्रेलर प्रेक्षकांसमोर title=

मुंबई : सिने-निर्माता अनुराग कश्यप याच्या ‘अग्ली’ या सिनेमाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. हा सिनेमा एक सायकोलॉजिकल थ्रिलर आहे.

सिनेमाचं पोस्टर 8 मे रोजी प्रदर्शित झालं होतं. ‘अग्ली’मध्ये रोनित रॉय, गिरीश कुलकर्णी, तेजस्विनी कोल्हापुरे, सुरवीन चावला आणि राहुल भट्ट मुख्य भूमिकेत आहेत.

2013 कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या डायरेक्टर्स फोर्टनाईट सेक्शनमध्ये या सिनेमाचं स्क्रिनिंग झालं होतं. याशिवाय ‘अग्ली’ 2014 न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित केली गेलीय.

सिनेमाचं कथानक शालिनीच्या (तेजस्विनी कोल्हापुरे) अवती भवती फिरत आहे. शालिनी तिच्या दुसऱ्या पतीसोबत – पोलीस चीफ बोस शौमिकसोबत (रोनित रॉय) आनंदात नाही आणि आत्महत्येच्या विचारात आहे. शौमिक शालिनीला घरातच बंदिस्त राहण्यासाठी जबरदस्ती करतो. ज्यामुळे वैतागून शालिनी आपल्या पतीच्या बंदुकीतून स्वत:वर गोळी झाडून घेणार असते, तेव्हाच तीची मुलगी ‘कली’ (अनिशिका श्रीवास्तव) तिथं दाखल होते. शनिवारचा दिवस असोत आणि कलीला आपल्या वडिलांना (राहुल भट्ट) भेटायचं असतं पण, तिचं अपहरण होतं... त्यानंतर सिनेमाला अनेक वेगळी वळणं मिळतात... 

पाहा, सिनेमाचा ट्रेलर...  

<iframe width="640" height="360" src="//www.youtube.com/embed/ZGnqtxA0NNs" frameborder="0" allowfullscreen></iframe>

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.