'एआयबी रोस्ट'चं समर्थन करत ट्विंकल राजकारण्यांवर कडाडली

बॉलिवूड अभिनेत्री आणि अक्षय कुमार याची पत्नी ट्विंकल खन्ना अचानक चर्चेत आलीय ती तिनं लिहिलेल्या एका ब्लॉगमुळे... 

Updated: Feb 18, 2015, 11:13 AM IST
'एआयबी रोस्ट'चं समर्थन करत ट्विंकल राजकारण्यांवर कडाडली title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि अक्षय कुमार याची पत्नी ट्विंकल खन्ना अचानक चर्चेत आलीय ती तिनं लिहिलेल्या एका ब्लॉगमुळे... 

'एआयबी रोस्ट'च्या समर्थनार्थ ट्विंकलनं हा ब्लॉग लिहिलाय. सध्या हाच ब्लॉग ट्विटरवर ट्रेंड करतोय. 'एआयबी रोस्ट'मध्ये सहभागी असलेल्या अर्जुन कपूर, करन जोहर आणि सोनाक्षी सिन्हानं या ब्लॉगचं कौतुक केलंय. 

काही दिवसांपूर्वी मुंबीत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात एकमेकांना अश्लिल वक्तव्य, शिव्या आणि अपशब्द वापरत बॉलिवूड कलाकारांनी या कार्यक्रमाला डोक्यावर घेतलं होतं. यावरून या कलाकारांविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आलीय. 

याच कार्यक्रमाबद्दल बोलताना ट्विंकलननं आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलंय की, 'राजकीय मंचारवर सत्तेत असलणाऱ्या एका पक्षाच्या सदस्यानं स्टेजवरून 'हरामजादे' शब्द वापरला होता. तो काही स्टँडअप कॉमेडियन नव्हता. पण, त्याच्याविरुद्ध काही तक्रार दाखल झाली नाही... ना कोणती कारवाई करण्यात आली. पण, एआयबी रोस्टच्या कॉमेडियन कलाकारांविरोधात एफआयआर दाखल झाली.'  

'मुंबईला बॉम्बेच म्हणणार'
ट्विंकल पुढे म्हणते, माझं शहर 'बॉम्बे' नेहमी माझ्या हृदयात राहील कारण मी त्याला याच नावानं ओळखते. एका राजकीय पक्षानं याला ब्रिटिश शासनाची निशाणी म्हणत शहराचं नाव बदलून मुंबई ठेलं. पण, काही आठवड्यांपूर्वी मिहिर जोशीच्या सिनेमात 'बॉम्बे' शब्द आल्यावर आपलं डोकं हलवण्यापासून मी स्वत:ला रोखू शकले नाही. 

'पुतळ्यांसाठी नाही शिक्षणावर खर्च करा'
गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 182 मीटर उंच पुतळ्यासाठी 2,979 कोटी रुपये मंजूर केले गेलत... अरबी समुद्रातील छत्रपती शिवजी महाराजांच्या स्मारकासाठी 1,900 कोटी रुपये देण्याची घोषणा करण्यात आलीय.... पण, हेच पैसे शिक्षणावर खर्च केले जात नाहीत? आज देशातील फक्त 10 टक्के मुलं उच्चशिक्षण घेत आहेत. या पुतळ्यांवर खर्च करण्याऐवजी नेत्यांनी शिक्षणावर हे पैसे खर्च करावेत, असा शहाणपणाचा सल्लाही ट्विंकलनं दिलाय.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.