चॉपरमधला स्टंट जीवावर बेतला, दोन अभिनेते बुडाले

हेलिकॉप्टरमधून स्टंट करणं कन्नड अभिनेत्यांच्या जीवावर बेतलं आहे. बंगळुरूपासून 35 किमी अंतरावर असलेल्या थिप्पागोंडानहल्ली लेकवर चित्रपटाचं शूटिंग सुरु होतं.

Updated: Nov 7, 2016, 06:51 PM IST
चॉपरमधला स्टंट जीवावर बेतला, दोन अभिनेते बुडाले

बंगळुरू : हेलिकॉप्टरमधून स्टंट करणं कन्नड अभिनेत्यांच्या जीवावर बेतलं आहे. बंगळुरूपासून 35 किमी अंतरावर असलेल्या थिप्पागोंडानहल्ली लेकवर चित्रपटाचं शूटिंग सुरु होतं. यावेळी हेलिकॉप्टरमधला स्टंट करताना अनिल आणि उदय हे दोघं लेकमध्ये पडले आणि तेव्हापासून त्यांचा शोध लागलेला नाही. या दोघांचाही मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आज दुपारी तीन वाजता हा प्रकार घडला आहे.

मस्ती गुडी या चित्रपटाचं शूटिंग सुरु असताना दुनिया विजय, अनिल आणि उदय यांनी शूटिंगचा भाग म्हणून तलावात उडी मारली. यापैकी विजय हा पोहत तिरावर आला, पण अनिल आणि उदय मात्र गायब झाले. या दोघांचाही शोध घेण्याचं काम अजून सुरु आहे.

पाहा स्टंटचा हा व्हिडिओ