न्यूड फोटो लिकचे, गुपीत उघडले स्वतः अभिनेत्रीने

छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध मालिका 'कहानी घर घर की' मधील पार्वती (साक्षी तन्वर)च्या मुलीची भूमिका करणारी अभिनेत्री प्रिती गुप्ताचे काही दिवसांपूर्वी लिक झालेल्या फोटोंचे रहस्य स्वतः प्रिती गुप्तानेच उघड केलं आहे. 

Updated: Jul 1, 2015, 09:25 AM IST
न्यूड फोटो लिकचे, गुपीत उघडले स्वतः अभिनेत्रीने title=

मुंबई : छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध मालिका 'कहानी घर घर की' मधील पार्वती (साक्षी तन्वर)च्या मुलीची भूमिका करणारी अभिनेत्री प्रिती गुप्ताचे काही दिवसांपूर्वी लिक झालेल्या फोटोंचे रहस्य स्वतः प्रिती गुप्तानेच उघड केलं आहे. 

प्रितीने 'अनफ्रिडम' या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटातील प्रितीने काही न्यूड सीन्स दिले आहेत.  काही सीन बोल्ड असल्याने तो भारतात बॅन करण्यात आला. त्यातील एका सीनमध्ये प्रिती संपूर्ण न्यूड झाली आहे. 
 


 

‘अनफ्रीडम’मधील फोटो लीक झाल्याने माझा खूप संताप होत आहे. न्यूड फोटो लीक झाल्याने माझ्या पर्सनल लाइफचा अपमान झाला आहे.  फोटो लीक करण्यावर आणि व्हायरल करण्यावर बॅन आणण्याची गरज आहे. एखादा न्यूड सीन शूट करणं, हे अत्यंत आव्हानात्मक असतं, असे अभिनेत्री प्रीती गुप्ताने प्रतिक्रिया व्यक्त करताना आहे.
 
 अनफ्रीडमची कथा मला आवडली. शिवाय वास्तव लोकांपर्यंत येणे गरजेचे आहे. भारतात सिनेमा बॅन करण्याच्या निर्णयावरही प्रीतीने नाराजी व्यक्त केली. होमोसेक्श्युअल असणं, ही नैसर्गिक गोष्ट आहे. भारतीय लोकांनी हा सिनेमा पाहण्याची गरज होती, असेही तिने सांगितले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.