प्रीती आणि प्रियांकाने केले एकमेकींचे कौतुक

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटाच्या लग्नाचा चर्चा सध्या सर्वत्र रंगल्या आहेत. 

Updated: Mar 6, 2016, 03:16 PM IST
प्रीती आणि प्रियांकाने केले एकमेकींचे कौतुक title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटाच्या लग्नाचा चर्चा सध्या सर्वत्र रंगल्या आहेत. प्रीतीने शनिवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्न केल्याची अधिकृत घोषणाही केली. तिच्यावर तेव्हापासून शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रानेही तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 'ओह माय गॉड, प्रीती. मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे. तुला आणि जीनला माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा', अशा शुभेच्छा प्रियांकाने दिल्या आहेत.

तर प्रीतीने प्रियांकाला 'थँक यू बेबी. तू ऑस्कर्समध्ये खूप छान दिसलीस. माझ्या हाय हील्स मी अजून घातल्या आहेत. हा हा. लव्ह यू' अशी प्रतिक्रिया दिलीये.

त्यावर प्रियांकाने तिला रिप्लाय देत 'येस बेबी... आपल्या हील्स आणि आपला दर्जा नेहमीच उंच असतो,' म्हटले आहे.