सोशल मिडियावर ट्रेंड करतोय मराठी सिनेमा व्हेंटिलेटर

अभिनेत्री प्रियंका चोपडाचा प्रोड्यूसर म्हणून पहिला मराठी चित्रपट व्हेंटिलेटर हा सध्या सर्वच सोशल साईट्सवर चर्चेचा विषय बनला आहे. सर्वच सोशल मिडिया साईट्सवर तो ट्रेंडिगमध्ये आहे. युट्युबवर बाबा संग हे सिनेमातील गाणं सध्या चांगलंच ट्रेंड करतंय. १ लाखाहून अधिक लोकांनी २४ तासामध्ये तो पाहिला आहे. तर सिनेमाचा ट्रेलर देखील १० लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

Updated: Nov 7, 2016, 07:05 PM IST
सोशल मिडियावर ट्रेंड करतोय मराठी सिनेमा व्हेंटिलेटर

मुंबई : अभिनेत्री प्रियंका चोपडाचा प्रोड्यूसर म्हणून पहिला मराठी चित्रपट व्हेंटिलेटर हा सध्या सर्वच सोशल साईट्सवर चर्चेचा विषय बनला आहे. सर्वच सोशल मिडिया साईट्सवर तो ट्रेंडिगमध्ये आहे. युट्युबवर बाबा संग हे सिनेमातील गाणं सध्या चांगलंच ट्रेंड करतंय. १ लाखाहून अधिक लोकांनी २४ तासामध्ये तो पाहिला आहे. तर सिनेमाचा ट्रेलर देखील १० लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

फेसबूकवर देखील हे गाणं मोठ्या प्रमाणात शेअर होतंय. ट्विटर ट्रेंडमध्ये येण्याचा मान देखील या सिनेमाला मिळाला आहे. खूप दिवसानंतर हा मराठी सिनेमा ट्रेंड करतोय. ४ नोव्हेंबरला हा सिनेमा रिलीज झाला असून तो चर्चेत आहेत. ११६ कलाकार या सिनेमाचा भाग आहे. मराठी आणि हिंदी या दोन्ही सिनेमामध्ये काम करणाऱ्या कलाकारांनी या सिनेमात काम केलंय.

व्हेंटिलेटरने सोशल मिडियावर खूप चांगल्या प्रकारे मराठी सिनेमा प्रमोट केलाय. सैराटनंतर झी स्टुडियोज प्रस्तूत हा व्हेंटिलेटर या सिनेमाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.