VIDEO : 'ए दिल...' सिनेमात फवादचा हा डिलीट केलेला सीन

पाकिस्तानी कलाकारांच्या सहभागामुळे सुरुवातीपासून वादात अडकलेला करन जोहर दिग्दर्शित 'ए दिल है मुश्किल' सिनेमा प्रेक्षकांसमोर आला... मात्र, प्रेक्षकांसमोर येईपर्यंत वेगवेगळ्या कारणांनी सिनेमातील अनेक सीन्स डिलीट झाले होते.

Updated: Dec 17, 2016, 10:40 AM IST
VIDEO : 'ए दिल...' सिनेमात फवादचा हा डिलीट केलेला सीन

मुंबई : पाकिस्तानी कलाकारांच्या सहभागामुळे सुरुवातीपासून वादात अडकलेला करन जोहर दिग्दर्शित 'ए दिल है मुश्किल' सिनेमा प्रेक्षकांसमोर आला... मात्र, प्रेक्षकांसमोर येईपर्यंत वेगवेगळ्या कारणांनी सिनेमातील अनेक सीन्स डिलीट झाले होते.

सोशल वेबसाईट 'यू ट्यूब'वर मात्र आता या डिलीट सीन्सचा एक व्हिडिओ दिसतोय. तीन दिवसांत आत्तापर्यंत या व्हिडिओला 578,898 हून अधिक हिटस् मिळालेत. 

यामध्ये पाकिस्तानी कलाकार फवाद खानचाही एक डिलीट करण्यात आलेला सीन आहे... या सिनेमानंतर फवादच्या अभिनयाचं बरचसं कौतुकही झालंय. 

तुम्ही हा सिनेमा पाहिला असेल पण काही अपूर्ण राहिलं असं वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की पाहा...