अभिनेत्री पूजा मिश्राचा हाय व्होल्टेज ड्रामा, व्हिडिओ झाला व्हायरल

नेहमीच वादात असणारी टिव्ही अभिनेत्री पूजा मिश्रा पुन्हा एकदा चर्चेत आलीय. पूजाचा एक व्हिडिओ लीक झालाय. या व्हिडिओमध्ये एका हॉटेल कर्मचाऱ्यासोबत धक्का-बुक्की करतांना ती दिसते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

Updated: Sep 13, 2015, 07:05 PM IST
अभिनेत्री पूजा मिश्राचा हाय व्होल्टेज ड्रामा, व्हिडिओ झाला व्हायरल  title=

मुंबई: नेहमीच वादात असणारी टिव्ही अभिनेत्री पूजा मिश्रा पुन्हा एकदा चर्चेत आलीय. पूजाचा एक व्हिडिओ लीक झालाय. या व्हिडिओमध्ये एका हॉटेल कर्मचाऱ्यासोबत धक्का-बुक्की करतांना ती दिसते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

या व्हिडिओमध्ये पूजा हॉटेलमधून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतेय आणि हॉटेलचे कर्मचारी तिला थांबविण्याचा प्रयत्न करत आहेत. धक्काबुक्कीसह पूजानं कर्मचाऱ्याला थोबाडितही मारलीय आणि त्याचा फोनही तोडलाय. हे भांडण कशामुळे झालं याचं कारण मात्र कळू शकलेलं नाही. 

यूट्यूबवर अपलोड व्हिडिओ-
 

टिव्ही सीरियलमधील ही अभिनेत्री बिग बॉस- ५मध्ये स्पर्धक होती. पूजानं काही महिन्यांपूर्वी एका हॉटेल कर्मचाऱ्यावर छेडछाडीचा आरोप लावला होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.