८४ वर्षांच्या अभिनेत्याचा २४ वर्षांच्या तरुणीशी विवाह

प्रेमाला वयाचं बंधन नसतं... कोणत्याही व्यक्तीवर आणि कोणत्याही वयात प्रेम होऊ शकतं... याचंच एक उदाहरण सेंट पीटर्सबर्गमध्ये नुकतंच पाहायला मिळालंय. 

Updated: Sep 15, 2015, 03:04 PM IST
८४ वर्षांच्या अभिनेत्याचा २४ वर्षांच्या तरुणीशी विवाह title=

सेंट पीटर्सबर्ग : प्रेमाला वयाचं बंधन नसतं... कोणत्याही व्यक्तीवर आणि कोणत्याही वयात प्रेम होऊ शकतं... याचंच एक उदाहरण सेंट पीटर्सबर्गमध्ये नुकतंच पाहायला मिळालंय. 

रशियाचा ८४ वर्षांचा प्रसिद्ध अभिनेता इवान फाइन याला एका २४ वर्षांच्या विद्यार्थीनीशी विवाह केलाय. या तरुणीचं नाव नतालिया शेवेल असं आहे. 

अधिक वाचा - गणेश आचार्याचं 'पोपट पिसाटला' गाणं घालतंय धुमाकूळ


सौ. डेली न्यूज

इवान आणि नतालियाची भेट एका इन्स्टिट्यूटमध्ये झाली होती. सेंट पीटर्सबर्गच्या लिबरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये इवान विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी गेला होता तर नतालिया इथं शिक्षण घेत होती. 

इथं नतालियानं इवानसाठी काही कविताही लिहिल्या होत्या. या कविता इवानला इतक्या आवडल्या की तो नतालियाच्या प्रेमातच पडला. या कवितांनी आपल्याला पुन्हा एकदा 'तरुण' केलं असं इवान म्हणतो.

यानंतर दोघांचीही जवळिक इतकी वाढली की एक दिवस इवाननं हिऱ्यांच्या अंगठीसोबत नतालियाला गुडघ्यावर बसून प्रपोजदेखील केलं. 

नतालियानंही वेळ न दवडता लग्नाचा हा प्रस्ताव स्वीकारला आणि दोघांनीही रजिस्ट्रार ऑफिस जाऊन विवाह केला. लग्नाच्या पार्टीत त्यांनी काही जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रांना आमंत्रित केलं होतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.