VIDEO TRAILER : भेटा मधुरच्या 'कॅलेंडर गर्ल्स'ना!

दिग्दर्शक मधुर भांडारकर याच्या बहुप्रतिक्षित 'कॅलेंडर गर्ल' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. २.२८ मिनिटांचा हा ट्रेलर आहे. 

Updated: Aug 18, 2015, 05:38 PM IST
VIDEO TRAILER : भेटा मधुरच्या 'कॅलेंडर गर्ल्स'ना! title=

नवी दिल्ली : दिग्दर्शक मधुर भांडारकर याच्या बहुप्रतिक्षित 'कॅलेंडर गर्ल' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. २.२८ मिनिटांचा हा ट्रेलर आहे. 

मधुर भांडारकरचे फॅशन, चांदनी बार, हिरोईन यांसारखे सिनेमे सुपरहीट ठरले होते... ग्लॅमरच्या क्षेत्रात वावरणाऱ्या सुंदर चेहऱ्यांना पेलावं लागणारं आव्हान मधुरच्या अनेक चित्रपटांतून दिसलंय. 
 
मधुरच्या इतर सिनेमांप्रमाणेच हा सिनेमाही तितकाच बोल्ड आणि बिनधास्त असल्याचं हा टीझर पाहून लक्षात येतं. 'कॅलेंडर गर्ल्स' हा सिनेमाही वरतून चकाचक दिसणाऱ्या जगात वावरणाऱ्या मॉडल्सच्या जीवनावर आधारित असल्याचं दिसतंय. 

पाच मॉडल्सच्या भूमिकेत आकांक्षा पुरी, अवनी मोदी, कायरा दत्ता, रुही सिंह आणि सतरुपा पाईन या दिसणार आहेत. या सिनेमातून या सर्व मॉडेल्स आपला बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहेत. हा सिनेमा २५ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.