पाहा अजयचा 'सिंघम रिटर्न्स'मधला फर्स्टलूक

बॉक्स ऑफिसवर अॅक्शन किंगची ओळख बनवणारा अजय देवगन पुन्हा एकदा अॅक्शन करण्यासाठी तयार आहे

Updated: Jul 7, 2014, 01:22 PM IST
पाहा अजयचा 'सिंघम रिटर्न्स'मधला फर्स्टलूक  title=
फाईल फोटो

मुंबई : बॉक्स ऑफिसवर अॅक्शन किंगची ओळख बनवणारा अजय देवगन पुन्हा एकदा अॅक्शन करण्यासाठी तयार आहे

अजयचा आगामी सिनेमा सिंघम रिटर्न्स फर्स्ट लूक सादर केलाय. हा सिनेमा २०११ मध्ये प्रदर्शित झालेला सिंघमचा सिक्वल असणार आहे. 

सिनेमाचा ट्रेलर अजून लॉन्च नाही झालाय. मात्र सिनेमाचा ट्रेलर पाहण्यासाठी लोक खूप उत्सुक आहेत. 

सिंघममध्ये अजयसोबत साऊथ अभिनेत्री काजल अग्रवालनी लिड फिमेलची भूमिका केली होती. मात्र आता अजयसोबत करिना कपूर- खान दिसणार आहे. 

अनुपम खैर आणि अमोल गुप्ते ही सिनेमात दिसणार आहे. रोहित शेट्टी हा सिनेमा १५ ऑगस्टला रिलीज होणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.