'निया' सिनेमातून बिपाशाच पत्ता कट

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू हिच्या करिअरला सध्या उतरती कळा लागली आहे. एकीकडे बॉक्स ऑफिसवर तिचे सिनेमे फ्लॉप होत आहेत. त्यातच भर की काय आता तिच्या हातातून मिळालेले सिनेमेदेखील निसटून जाताना दिसतायत. 

Updated: May 14, 2015, 02:33 PM IST
'निया' सिनेमातून बिपाशाच पत्ता कट title=

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू हिच्या करिअरला सध्या उतरती कळा लागली आहे. एकीकडे बॉक्स ऑफिसवर तिचे सिनेमे फ्लॉप होत आहेत. त्यातच भर की काय आता तिच्या हातातून मिळालेले सिनेमेदेखील निसटून जाताना दिसतायत. 

काही दिवसांपूर्वी चर्चा होती की, विक्रम फडणीस दिग्दर्शित 'निया' सिनेमात बिपाश बासू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या सिनेमातूनही बिप्सला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. 

बिपाशाने या सिनेमासाठी तिच्याकडून तारखादेखील दिल्या होत्या. मात्र, अजूनही सिनेमाचं शूटिंगच सुरु होत नव्हतं... आणि आता तर या सिनेमातूनच बिपाशाला काढण्यात आल्याची चर्चा आहे. 

बिपाशानंतर या सिनेमासाठी अभिनेत्री विद्या बालन हिच्याशी निर्मात्यांनी संपर्क साधलाय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.