'मकडी'नंतर श्वेतासोबत करणार सिनेमा - विशाल भारद्वाज

Updated: Oct 3, 2014, 08:33 PM IST
'मकडी'नंतर श्वेतासोबत करणार सिनेमा - विशाल भारद्वाज title=

 

नवी दिल्ली: चाइल्ड आर्टिस्ट म्हणून नॅशनल अॅवॉर्ड विजेता राहिलेली अभिनेत्री श्वेता बासू प्रसादला 31 ऑगस्ट रोजी हैदराबादमध्ये पोलिसांनी अटक केली होती. आपल्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी ती सेक्स रॅकेटचा भाग झाली होती, असं तिनं कबूलही केलं होतं.

तिला सपोर्ट करण्यासाठी दीपिका पादुकोण, हंसल मेहता आणि साक्षी तन्वर  यासारखे अनेक बॉलिवूड सेलेब्स उघडपणेसमोर आले. या लिस्टमध्ये अजून एका नावाचा समावेश झाला आहे. ते म्हणजे विशाल भारद्वाजाच... नुकताच त्यांचा 'हैदर' हा सिनेमा रिलीज झालाय. विशालला श्वेतासोबत एक सिनेमा करण्याची इच्छा आहे. 

विशाल भारद्वाजच्या 'मकडी' या सिनेमातून श्वेताने चाइल्ड आर्टिस्ट म्हणून बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत विशाल भारद्वाज बोलले, श्वेतासारख्या हुशार अभिनेत्रीवर कथा बनविण्याची त्यांची इच्छा आहे.

श्वेताबरोबर घडलेल्या सर्व घटनेसाठी विशालनं मीडियावर आरोप केलाय. जे या रॅकेटमध्ये बिझनेसमन होते त्यांचं नाव घोषित करण्याऐवजी
श्वेताच्या पॉप्युलॅरिटीचा गौरफायदा  घेऊन तिच्यावर निशाना साधला असल्याचंही तो म्हणाला.

विशालने अजूनपर्यंत तरी त्याची ही इच्छा श्वेतासमोर व्यक्त केली नाही. सर्वात पहिले श्वेताने हा वाद व्यवस्थितपणे संपवल्यानंतर तिच्याशी बोलणार असं सांगितलंय. श्वेताला 2 महिन्यांसाठी सुधार गृहात पाठविले होते. तिने स्टार प्लसवरील प्रसिद्ध कार्यक्रम 'कहानी घर-घर की'मध्ये साक्षी तन्वरच्या मुलीची भूमिका केली होती. त्याचबरोबर तिने 2005मध्ये आलेली 'इकबाल' महत्त्वाची भूमिका केली होती. तिने साउथमध्ये सुद्धा काही लो बजट सिनेमे केले होते. 

विशालचा हैदर हा सिनेमा २ ऑक्टोबरला रिलीज झाला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.