अन् परिणीती चोपडा ढसाढसा रडली

अभिनेत्री परिणीती चोप्राला एका वेगळ्या अनुभवाला सामोरे जावे लागले. बॉलिवूडच्या सेलिब्रेटींसाठी आयोजित 'मसान'च्या खास शोला ती हजर होती. चित्रपटातील ह्रदयस्पर्शी प्रसंगाच्यावेळी परिणीतीला आपले अश्रू आवरता आले नाहीत. ती थिएटरमध्ये ढसाढसा रडली.

Updated: Jul 24, 2015, 07:22 PM IST
अन् परिणीती चोपडा ढसाढसा रडली title=
फाइल फोटो

मुंबई : अभिनेत्री परिणीती चोप्राला एका वेगळ्या अनुभवाला सामोरे जावे लागले. बॉलिवूडच्या सेलिब्रेटींसाठी आयोजित 'मसान'च्या खास शोला ती हजर होती. चित्रपटातील ह्रदयस्पर्शी प्रसंगाच्यावेळी परिणीतीला आपले अश्रू आवरता आले नाहीत. ती थिएटरमध्ये ढसाढसा रडली.

 

'' हा एक काळजाला हात घालणारा ह्रदयस्पर्शी चित्रपट आहे.  चित्रपट पाहाताना मी खूप रडले. रिचाने केलेला अभिनय अप्रतिम आहे. विकीने तर मन हेलावून टाकले. या चित्रपटाच्या टीमचे अभिनंदन. हा एक हिट चित्रपट आहे '', असे परिणीती म्हणाली.

या चित्रपटात रिचा चड्डा, विकी कौशल, संजय मिश्रा आणि श्वेता त्रिपाठी यांच्या प्रमुख भूमिका आहे. 'मसान' या चित्रपटाला कान्स चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळाला होता. 

शुक्रवारी 'मसान' प्रदर्शित होणार असून सलग तीन दिवस चित्रपटाचे खास शो बॉलिवूड कलाकारांसाठी आयोजित करण्यात आले होते.  राजकुमार हिराणी, कबीर खान, शबाना आझमी, दीया मिर्झा या कलाकारांनी हा चित्रपट पाहिला आणि खूप कौतुक केले. या कौतुकात आता परिणीतीही सहभागी झाली आहे.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.