यामुळे अभिषेक-करिश्माचा साखरपुडा मोडला?

बॉलीवूडमध्ये असे फार कमी जोडपी असतील ज्यांनी शेवटपर्यंत एकमेकांना साथ दिलीये. नाहीतर ब्रेकअप हे बॉलीवूडमध्ये ठरलेलेच. बॉलीवूडमध्ये ज्युनियर बच्चन अशी ओळख असलेल्या अभिषेक बच्चनचीही एक लव्हस्टोरी पूर्ण होता होता राहिली. 

Updated: Feb 5, 2017, 04:48 PM IST
यामुळे अभिषेक-करिश्माचा साखरपुडा मोडला?

मुंबई : बॉलीवूडमध्ये असे फार कमी जोडपी असतील ज्यांनी शेवटपर्यंत एकमेकांना साथ दिलीये. नाहीतर ब्रेकअप हे बॉलीवूडमध्ये ठरलेलेच. बॉलीवूडमध्ये ज्युनियर बच्चन अशी ओळख असलेल्या अभिषेक बच्चनचीही एक लव्हस्टोरी पूर्ण होता होता राहिली. 

सध्या अभिषेक आणि ऐश्वर्या बॉलीवूडमधील प्रसिद्ध कपल असले तरी ऐश्वर्या हे अभिषेकचे पहिले प्रेम नव्हते. अभिषेक आणि करिश्मा यांची लव्हस्टोरी सर्वच जाणतात. असंही म्हटलं जात की या दोघांचा साखरपुडाही झाला होता. 

करिश्मा आणि अभिषेक एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते. अभिषेकची बहिण श्वेताच्या लग्नात हे दोघं एकमेकांच्या जवळ आले. 

इतकंच नव्हे तर अभिषेक-करिश्माच्या साखरपुड्याची जाहीर घोषणाही करण्यात आली होती. मात्र त्यावेळी असे काही घडले की अभिषेक-करिश्मा कायमचे दुरावले. करिश्माची आई बबिता यांना अभिषेक फारसा आवडत नव्हता. 

यादरम्यान अभिषेकचे अनेक चित्रपट फ्लॉप होत होते तर करिश्मा त्यावेळी सुपरहिट हिरोईन होती. बबिता यांना ही भीती होती की अभिषेक यशस्वी नाही झाला तर काय होणार. अखेर आईच्या दबावापुढे करिश्माला झुकावे लागले आणि त्यांनी साखरपुडा मोडण्याचा निर्णय घेतला.