www.24taas.com, झी मीडिया, न्यू यॉर्क
पुरूष नेहमी सेक्सबाबत विचार करत असतात, असे मानले जाते. या संदर्भात अनेक अभ्यास करण्यात आले आहेत. सेक्सने तुम्हांला केवळ चांगलेच वाटत नाही तर तुमची तब्येतही सुधारते. आता या सर्व अभ्यासांना फाटा देणारा एक नवीन अभ्यास अमेरिकेत समोर आला आहे. सर्वेक्षणानुसार बहुतांशी अमेरिकी नागरिक सेक्सपेक्षा इतर गोष्टींना अधिक महत्त्व देतात.
आता तुम्ही विचार करणार की सेक्सपेक्षा अधिक महत्त्वाचे काय असणार.... सेक्स आणि इतर गोष्टींमध्ये बाजी मारली ती इतर गोष्टींनी...
ह्युफिंगस्टन पोस्ट डॉट कॉमने केलेल्या सर्वेक्षणात १० गोष्टींवर अमेरिकन लोकांची मते जाणून घेतली त्यात सेक्स १०मध्ये खूप खालच्या क्रमांकावर होते. अशा १० गोष्टी ज्या शिवाय तुम्ही जगू शकत नाही. त्यात जेवण, कार, इंटरनेट एक्सेस, सेलफोन्स आणि कम्प्युटर, नेव्हिगेशन सिस्टिम, सोशल नेटवर्कींग, टॅबलेट, सेक्स यांचा समावेश होते.
सर्वेक्षणानुसार २० टक्के युवक सेक्स दरम्यान आपला स्मार्टफोन चेक करतात. ब्रिटनमध्ये ६२ टक्के महिला आणि ४८ टक्के पुरूषांनी याला दुजोरा दिला.
सर्वेक्षणानुसार जेवण- ७३ टक्के, कार – ४२ टक्के, इंटरनेट एक्सेस - २८, मोबाईल- २६ टक्के, कम्प्युटर २४ टक्के, टीव्ही - २३ टक्के, सेक्स २० टक्के, नेव्हिगेशन सिस्टिम ८ टक्के, सोशल नेटवर्कींग साइट्स ७ टक्के आणि टॅबलेट - ६ टक्के
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.