हिंसाचाराचा दुष्परिणाम होतो 'सेक्स'वर

गुन्हेगारी, शिवीगाळ आणि हिंसाचार वाट्याला आलेल्या स्त्रियांमध्ये सेक्सबद्दल एक प्रकारची रानटी भावना निर्माण होते. यामुळेच अशा स्त्रियांना एड्स होणयाचं किंवा अकाली गर्भार राहाण्याचं प्रमाण वाढतं.

Updated: Jul 4, 2012, 06:51 PM IST

www.24taas.com, लंडन

 

गुन्हेगारी, शिवीगाळ आणि हिंसाचार वाट्याला आलेल्या स्त्रियांमध्ये सेक्सबद्दल एक प्रकारची रानटी भावना निर्माण होते. यामुळेच अशा स्त्रियांना एड्स होणयाचं किंवा अकाली गर्भार राहाण्याचं प्रमाण वाढतं.

 

लेखिका जेनिफर वॉल्श म्हणाल्या, “दुर्दैवाने आमच्या निष्कर्षातून असं सिद्ध झालं की ज्या महिलांनी बालवयात किंवा तरुणपणी हिंसाचाराचा सामना केलाय, त्यांच्यात सेक्सबद्दल एक प्रकारची रुक्ष उत्तेजना निर्माण होते. त्यामुळेच बऱ्याचदा अशा महिलांना एड्स होतो. किंवा अवेळी गरोदर होतात.”

 

या प्रयोगासाठी ४८१ स्त्रियांचा अभ्यास करण्यात आला. त्यांचा पूर्वेतिहास जाणून घेतल्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या हिंसेमुळे सेक्सबद्दल त्यांच्या वागण्यात एक प्रकारचा निष्ठुरपणा आला होता. सेक्समध्ये वाट्टेल तो धोका पत्करायची त्यांची मानसिक तयारी झाली होती.

 

ज्यांनी मोठ्या प्रमाणावर हिंसाचार पाहिला आहे, अशा महिलांमध्ये अत्यंत बेफिकिरीने आणि त्रासदायक सेक्स करण्याचं प्रमाण जास्त होतं. बऱ्याचवेळा अशा स्त्रियांचे पार्टनर सेक्सपूर्वी दारूच्या नशेत अथवा ड्रग्स घेऊन संवेदनांच्या पलिकडे गेलेले असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं प्रेम न मिळता केवळ रानटी सेक्सच या स्त्रियांना मिळाला होता.