फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची प्रोफाईल

भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे आज शुक्रवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. उद्योगपती, सिनेस्टार आणि खेळाडू यांच्या प्रमुख उपस्थितीत वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्रीपद शपथविधीचा दिमाखदार सोहळा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा हे या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. राज्यपाल सी. विद्यासागर राव हे देवेंद्र यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या मंत्र्यांची  प्रोफाईल पाहा.

Updated: Oct 31, 2014, 01:35 PM IST
फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची प्रोफाईल title=

मुंबई : भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे आज शुक्रवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. उद्योगपती, सिनेस्टार आणि खेळाडू यांच्या प्रमुख उपस्थितीत वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्रीपद शपथविधीचा दिमाखदार सोहळा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा हे या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. राज्यपाल सी. विद्यासागर राव हे देवेंद्र यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या मंत्र्यांची  प्रोफाईल पाहा.

मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील काही सदस्यांचाही शपथविधी होईल. मात्र, हे सदस्य कोण यांची नावे मात्र रात्री उशिरापर्यंत भाजपने जाहीर केली नव्हती. सकाळी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दहा जणांना मंत्रीपदाची शपथ देण्यात येणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या मंत्र्यांची  प्रोफाईल

कॅबिनेट मंत्री
देवेंद्र फडणवीस @ :
भाजपचे महाराष्ट्रातले पहिले मुख्यमंत्री
विदर्भातील चौथे मुख्यमंत्री बनण्याचा मान
नागपूरमधून सलग चारवेळा आमदार
नगरसेवक, महापौर, आमदार ते मुख्यमंत्री
2013 मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष

एकनाथ खडसे @ :
सलग सहावेळा मुक्ताईनगरमधून विधानसभेवर
युती सरकारमध्ये अर्थ, उच्च शिक्षण खात्याचे मंत्री
विरोधी पक्षनेते म्हणून उत्तम कामगिरी
कोथळी गावचे सरपंच ते भाजपचे ज्येष्ठ नेते
खान्देशातील भाजपचा चेहरा 

सुधीर मुनगंटीवार @ :
सलग पाचवेळा विधानसभेचे आमदार
माजी प्रदेशाध्यक्ष, गडकरींचे खंदे समर्थक 
युती सरकारमध्ये पर्यटन, ग्राहक संरक्षण मंत्री
अनुभवी, अभ्यासू, वक्तृत्व असलेला नेता
बल्लारपूर तालुक्याच्या निर्मितीत योगदान 
 
विनोद तावडे @ :
विधान परिषदेतील प्रभावी विरोधी पक्षनेते
मुंबई भाजपचे सर्वात तरूण अध्यक्ष होण्याचा मान
भाजपमधील मराठा नेतृत्व
अभाविपच्या माध्यमातून भाजपमध्ये सक्रीय
सर्वपक्षीय नेत्यांशी उत्तम संबंध
 
पंकजा पालवे @ : 
परळीतून दुस-यांदा आमदार
भाजप कोअर कमिटीच्या सदस्या
मराठवाड्यातील भाजपचा मोठा चेहरा
गोपीनाथ मुंडेंच्या वारसदार
स्त्री भ्रूण हत्येस पायबंद घालण्यासाठी लेक वाचवा, राष्ट्र वाचवा अभियान

प्रकाश मेहता @ :
सलग सहावेळा घाटकोपरमधून आमदार
मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष
युती सरकारच्या काळात उत्पादन शुल्क मंत्री
मुंबई उपनगर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री
आणिबाणी विरोधी आंदोलनात सहभाग
 
विष्णू सावरा @ :
विक्रमगडचे विद्यमान आमदार
सहावेळा विधानसभेवर निवड
आदिवासी नेता अशी ओळख
युती सरकारच्या काळात आदिवासी विकासमंत्री
नव्या पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री होण्याची शक्यता

चंद्रकांत पाटील @ :
सामाजिक प्रश्नांची जाण असणारे कोल्हापूर जिल्ह्यातील नेते
शिक्षण - बी. कॉम
1980 ते 1993 - विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ कार्यकर्ते
1995 ते 1999 - आरएसएसचे कोल्हापूर विभाग सहकार्यवाह
2008 पासून पुणे पदवीधरमधून विधान परिषदेवर सदस्य
महाराष्ट्र विधान परिषदेत भाजपचे प्रतोद 
भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष म्हणून काम 
भाजप महाराष्ट्र प्रदेशचे माजी सरचिटणीस 
शिक्षण, सामाजिक, राजकीय क्षेत्राचा अनेक वर्षांचा अनुभव
सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांची संघटनात्मक जबाबदारी 
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे सरचिटणीस

राज्यमंत्री

विद्या ठाकूर @ :
गोरेगावमधून भाजपच्या आमदार
भाजपचा उत्तर भारतीय चेहरा
मुंबईच्या माजी उपमहापौर
मुंबई मनपात चारवेळा नगरसेविका

दिलीप कांबळे @ :
पुणे कँटोन्मेंटमधून दुस-यांदा विजयी
युती सरकारच्या काळात राज्यमंत्री
भाजपचा दलित चेहरा
स्वारगेट एसटी स्थानकातले एकेकाळचे फुलविक्रेते

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.