लॉबिंग सुरु… असं असेल ‘फडणवीस’ मंत्रिमंडळ?

३१ तारखेला होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्र्यांसह १२ मंत्र्यांना शपथ दिली जाईल अशी सूत्रांची माहिती आहे... हा सोहळा दिवसांवर आला असताना मंत्रिमंडळात कुणाकुणाची वर्णी लागणार याबाबत अनिश्चिता आहे.

Updated: Oct 29, 2014, 01:51 PM IST
लॉबिंग सुरु… असं असेल ‘फडणवीस’ मंत्रिमंडळ? title=

मुंबई : ३१ तारखेला होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्र्यांसह १२ मंत्र्यांना शपथ दिली जाईल अशी सूत्रांची माहिती आहे... हा सोहळा दिवसांवर आला असताना मंत्रिमंडळात कुणाकुणाची वर्णी लागणार याबाबत अनिश्चिता आहे.

दुसरीकडे १५ वर्षांनी सत्ता आल्यामुळे अनेक जण मंत्रिमंडळात येण्यास इच्छुक आहेत. मात्र मंत्रिमंडळात वर्णी लावण्यासाठी कुणाकडे लॉबिंग करायची असा प्रश्न या इच्छूकांना पडला आहे. 

भाजपामध्ये सध्या सर्व निर्णय हे नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा घेत आहेत. मुख्यमंत्रीपदासाठी गडकरींपासून खडससेंपर्यंत या पदासाठी पक्षश्रेष्ठींवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु मोदी आणि शहा या दबावाला बळी पडले नाहीत. या नेत्यांसमोरही पदासाठी कुणासमोर लॉबिंग करायचं हा प्रश्न होता. कारण मोदी आणि अमित शहांसमोर कुणाचे लॉबिंग चालत नाही. 

त्यामुळे मंत्रीपदासाठी इच्छूक असणाऱ्यांनाही लॉबिंग कुठे करायचं हा प्रश्न पडला आहे. त्यातल्या त्यात राज्यातल्या मोठ्या नेत्यांकडेच शब्द टाकणं त्यांच्या हातात आहे.

भाजप सरकारमधील संभाव्य मंत्री
- एकनाथ खडसे, मुक्ताईनगर
- गिरीश महाजन, जामनेर 
- संजय सावकारे, भुसावळ
- विनोद तावडे, मुंबई
- प्रकाश मेहता
- आशिष शेलार
- गिरीश बापट, पुणे
- शिवाजीराव नाईक, सांगली
- राम शिंदे, नगर
- पंकजा मुंडे, परळी
- संभाजी निलंगेकर, निलंगा
- हरिभाऊ बागडे, फुलंब्री औरंगाबाद
- सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूर
- चैनसुख संचेती, बुलढाणा
- सुनील देशमुख, अमरावती
- चंद्रशेखर बावनकुळे, कामठी
- मदन येरावार, यवतमाळ
- राजेंद्र पटणी, वाशिम
- राजकुमार बडोले, गोंदिया
- गोवर्धन शर्मा, अकोला
- संजय केळकर, ठाणे
- विष्णू सावरा, पालघर

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.