UPDATE: या 'बंडोबां'चे आज झाले 'थंडोबा'!

इच्छुक पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यानं राज्यभरात सर्वच राजकीय पक्षांना बंडखोरीचा सामना करावा लागलाय. अनेक उमेदवारांनी बंडाचं शस्त्र उपसलंय. मात्र विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असल्यानं बंडखोरांना शांत करण्याचा नेतेमंडळी चांगलाच प्रयत्न करतांना दिसतायेत. अनेक बंडोबांचा आता त्यामुळं थंडोबा झालाय. 

Updated: Oct 1, 2014, 07:01 PM IST
UPDATE: या 'बंडोबां'चे आज झाले 'थंडोबा'! title=

मुंबई: इच्छुक पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यानं राज्यभरात सर्वच राजकीय पक्षांना बंडखोरीचा सामना करावा लागलाय. अनेक उमेदवारांनी बंडाचं शस्त्र उपसलंय. मात्र विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असल्यानं बंडखोरांना शांत करण्याचा नेतेमंडळी चांगलाच प्रयत्न करतांना दिसतायेत. अनेक बंडोबांचा आता त्यामुळं थंडोबा झालाय. 

राज्यात एकूण 7646 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यामधील 6494 वैध ठरवण्यात आले आहे. नांदेड दक्षिणमध्ये सर्वाधिक 85 उमेदवार असून सिन्नरमध्ये 7 उमेदवार रिंगणात आहेत. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळं थोड्याच वेळात कुठून कोण फायनल उमेदवार असतील, याचा निर्णय लवकरच होणार आहे.  

पाहा कोणते बंडोबा झाले थंड!

> ज्ञानेश्वर दळवी, सुरेखा जाधव, भारत हरपुडे यांची मावळ मतदारसंघातून माघार, आमदार बाळा भेगडेंना देणार पाठिंबा

> पिंपरी मतदारसंघ: अमर साबळे आणि सुशील मंचेकर यांच्यासह १३ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज घेतला मागे... आता पिंपरी मतदारसंघासाठी २३ उमेदवार रिंगणात.

> मावळ मतदारसंघ: बाळासाहेब नेवले, किशोर भेगडे, रत्नमाला करंडे आणि अज बाखरिया (बसपा) यांची माघार आणि माऊली दाभाडे यांना (राष्ट्रवादी काँग्रेस) पाठिंबा

> भोसरी मतदार संघातून वसंत लोंढे, दत्ता साने, माऊली जाधव, बाळासाहेब गव्हाणे, प्रकाश चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज घेतले मागे. आता भोसरीत १७ उमेदवार रिंगणात.. उमेदवार महेश लांडगे यांना 'नारळ' हे निवडणूक चिन्ह...

> नाशिक जिल्ह्यात ९१ उमेदवारांनी घेतली माघार, १७३ उमेदवार रिंगणात... नाशिक शहरात ५७ उमेदवारांनी घेतली माघार

> इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादीच्या जयंत पाटील विरोधात अर्ज भरलेल्या शिवसेना, भाजप उमेदवाराची माघार. शिवसेनेचे भीमराव माने आणि भाजपचे नानासाहेब महाडिक यांनी अर्ज घेतला मागे. आता 
इस्लामपूरमध्ये जयंत पाटलांविरोधात थेट काँग्रेसचे जितेंद्र पाटील आणि मनसेचे उदय पाटील असा सामना रंगेल. खरी रंगत काँग्रेस आणि राष्ट्रवादीत... भाजप-सेनेचा अपक्ष उमेदवार अभिजित पाटील याला पाठिंबा

> द. कऱ्हाडमधून राष्ट्रवादीचे उमेदवार राजेंद्र यादव यांनी आपला अर्ज मागे घेतलाय. विलासकाका उंडाळकर यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा.

> शिवसेनेचे बंडखोर रमेश म्हात्रे यांनी भाजपच्या तिकीटावर कल्याण ग्रामीणमधून उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांनी आपला अर्ज आज मागे घेतलाय. त्यांची नाराजी दूर करण्यात शिवसेनेला यश आलंय. त्यांना विधान परिषदेची आमदारकी आणि मुलाला नगरसेवक पद देण्याचं आश्वासन मातोश्रीवरून मिळालंय. 

> औरंगाबादमध्ये मनसेला धक्का, जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर यांचा मनसेला रामराम, लवकरच भाजपमध्ये करणार प्रवेश.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.