ऑडिट लातूर जिल्ह्याचं...

महाराष्ट्राच्या दक्षिणपूर्व सीमेवर असलेला हा जिल्हा... औरंगाबाद विभागातील महत्त्वाचा जिल्हा म्हणून लातूरची ओळख आहे असून महाराष्ट्राच्या राजकारणतही या  जिल्ह्यातील नेत्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.

Updated: Oct 8, 2014, 04:31 PM IST
 title=

लातूर : महाराष्ट्राच्या दक्षिणपूर्व सीमेवर असलेला हा जिल्हा... औरंगाबाद विभागातील महत्त्वाचा जिल्हा म्हणून लातूरची ओळख आहे असून महाराष्ट्राच्या राजकारणतही या  जिल्ह्यातील नेत्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.

लातूर जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघ असून विद्यमान परिस्थीतीत 4 विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत तर भाजप आणि राष्ट्रीय समाज पक्षाचा प्रत्येकी एक आमदार आहे.

बाबासाहेब पाटील हे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार निवडून आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वळचणीला गेले.

विधानसभानिहाय परीस्थिती बघीतल्यास लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे अमित देशमुख हे आमदार आहेत.

अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व राष्ट्रीय समाज पक्षाचे बाबासाहेब पाटील करत आहते. तर उदगीर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे सुधाकर भालेराव हे आमदार आहेत.

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातचं प्रतिनिधीत्व काँग्रेसचे वैजनाथ शिंदे करत आहेत. तर निलंगा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचेच शिवाजीराव निलंगेकर हे आमदार आहेत.

तर औसा विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व काँग्रेसचे  बसवराज पाटील करत आहेत.

ही लातूर जिल्ह्याची विद्यमान राजकीय परिस्थीती असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने इच्छुक उमेदवारांनी कंबर करली आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.