ऑडिट विधानसभा मतदारसंघ - कन्नड

 मनसेला रामराम ठोकून शिवसेनेचा धनुष्य हाती घेणारे हर्षवर्धन जाधव यांचा कन्नड मतदारसंघ म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील एक महत्वाची लढत.

Updated: Oct 7, 2014, 09:09 PM IST
 title=

कन्नड :  मनसेला रामराम ठोकून शिवसेनेचा धनुष्य हाती घेणारे हर्षवर्धन जाधव यांचा कन्नड मतदारसंघ म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील एक महत्वाची लढत.

हर्षवर्धन जाधव यांचे वडिल रायभान जाधव आणि मातोश्री तेजस्विनी जाधव या दोघांनीही या मतदारसंघातून आमदारकी भूषवली आहे. 

मात्र आता हर्षवर्धन जाधव मनसेतून शिवसेनेत गेल्याने इथले राजकीय रंग बदलण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद मतदारसंघातील कन्नड मतदारसंघ, हा आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे राज्यात चर्चेत आलेला हा मतदारसंघ. 

कन्नड मतदार संघ काळभुई, घाटमाथा आणि खानदेशपट्टा या तीन भूप्रदेश भागात मोडला जातो. तब्बल 240 गाव या मतदारसंघात आहेत.

रायभान जाधव यांची तीन टर्म, त्यानंतर तेजस्वीनी जाधव यांची टर्म, यांच्यामुळे जाधवांचा हा तसा परंपरागत मतदारसंघ. अपवादाने 1999 मध्ये काँग्रेसच्या नितीन पाटील आणि 2004 मध्ये शिवसेनेच्या नामदेव पवार यांनी आमदारकी भूषवली. पण सत्तेचा आणि जाधवांचा हा दुरावा १० वर्षांनी संपवला तो मनसेच्या तिकीटावर उभ्या असलेल्या हर्षवर्धन जाधवांनी.

पणनंतर बदलेल्या राजकिय समीकरणांमुळे हा मतदारसंघ पुन्हा चर्चेत आलाय. यावेळेस हर्षवर्धन जाधव शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहेत.

मात्र यावेळेस ही निवडणूक त्यांना म्हणावी तशी सोपी जाणार नाही असेच चित्र दिसतेय. यावेळी मतदारसंघातील लढत चौरंगी होण्याची शक्यता आहे. 

2 लाख 75 हजार मतदार असलेल्या या मतदारसंघात 2009ची आकडेवारी पाहता, हर्षवर्धन जाधव यांना 46106 मतं पडली होती तर राष्ट्रवादी बंडखोर उदयसिंग राजपूत यांना 41999 मतं पडली होती..तर काँग्रेसचे भरतसिंग राजपूत 24569 मतांसह तिस-या स्थानी राहिले होते. मात्र शिवसेनेत प्रवेश केल्याने यावेळेस हर्षवर्धन यांची ताकत निश्चितच वाढली आहे..

त्यातच विकासकामं मोठ्या प्रमाणात केल्यानं विजयचा विश्वास असल्याचं हर्षवर्धन जाधव सांगतात..

यावेळेसही राष्ट्रवादीकडून उदयसिंग राजपूत पुन्हा निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहे. 

 त्यामुळं गेल्यावेळेस अवघ्या 4 हजार मतांनी पराभव झालेले उदयसिंह राजपूत यावेळेस हर्षवर्धन जाधवांचा पराभव करण्याचा विश्वास व्यक्त करीत आहेत.

मतदारांच्या बाबतीतही कही खुशी कही गम असेच चित्र आहे.. जाधव घराण्याला पारंपरिक मतांचा फार मोठा आधार आहे. पण काही नागरिक मात्र जाधव विकासकामांत अपयशी ठरल्याचा आरोप करताय.

आमदारांनी काम केलं आणि काम नाही केलं असे दोन्ही प्रकारचे बाईट आहेत. एकूणच मतदारसंघाचा विचार करता काही महत्वाच्या समस्या या निवडणुकीत महत्त्वाच्या ठरणार आहे.

गौताळा सारखे अभयारण्य, दोन किल्ले असूनही मोठं पर्यटन केंद्र होऊ शकले नाही. शहरांअतर्गत आणि ग्रामिण भागात रस्त्यांचे जाळं फारच तोकडं आहे.

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा आहे, शिवना टाकळी प्रकल्प जवळ असूनही ते पाणी कन्नडपर्यंत पोहोचू शकले नाही. आमदार जनसंपर्कात फारच कमी पडतोय आमदार दिसतच नसल्याचा गावक-यांचा आरोप आहे.

राजपूत आणि जाधव यांच्याबरोबरच सध्या काँग्रेसकडून माजी आमदार नामदेव पवार यांना उमेदवारी मिळाली आहे. 

त्यामुळे नेहमीच चर्चेत असणारा हा मतदारसंघात यावेळेस नक्की काय होणार याचीच उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.