ऑडिट पालघर जिल्ह्याचं...

पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात राजकीयपक्षांची असलेली ताकत आता आपण बघितलंय. आता आपण पाहणार आहोत काही मोजक्या मतदारसंघातील एकूण परिस्थिती.

Updated: Oct 8, 2014, 05:07 PM IST
 title=

पालघर : पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात राजकीयपक्षांची असलेली ताकत आता आपण बघितलंय. आता आपण पाहणार आहोत काही मोजक्या मतदारसंघातील एकूण परिस्थिती.

पालघर विधानसभा मतदार संघ हा चर्चेतला मतदारसंघ कारण या मतदारसंघाचे आमदार राजेंद्र गावीत हे मंत्री आहेत आणि आगामी निव़डणूक चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

शैक्षणिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला पालघर विधानसभा मतदारसंघ. संत सोनोपंत दांडेकर यांची ही कर्मभूमी, त्यांनीच या भागात शैक्षणिक आणि सांस्कृतिक मुळं रोवली. 

पालघर जिल्ह्यातील पालघर विधानसभा मतदारसंघ हा अनुसुचित जमातीसाठी राखीव मतदार संघ आहे. 

पालघर आणि डहाणु तालुक्याचा बहुतांश भाग या मतदार संघात येतो. भागात मच्छिमार, वाडवळ, कुणबी, बंजारी, आगरी आणि आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात राहतो.  

जवळपास २ लाख २७ हजार ७९५ मतदार या मतदार संघात असुन १ लाख १० हजार ८७ महिला तर १ लाख १७ हजार ७०८ पुरुष मतदार आहेत.  

एकेकाळचा शिवसेनेचा बाल्लेकिल्ला अशी या मतदार संघाची ओळख. शिवसेनेचा बालेकिल्ला २००९ मध्ये काँग्रेसने खेचून आणला. राज्यमंत्री राजेंद्र गावीत हे या मतदार संघाचे आमदार आहेत.   

गावितांनी ५५ हजार ६६५ मत मिळवीत शिवसेनेच्या मनिषा निमकर यांचा पराभव केला. त्यावेळेस मनिषा निमकर यांना ३४ हजार ६९४ तर शिवसेनेचे बंडखोर म्हणून उभे राहिलेले शंकर नम यांना ३ ०हजार ६८३ मत मिळाली होती. 

मिळालेल्या आमदारकीसोबत मंत्रीपदाचा गावीत यानी वापर करत विकासकामांचा धडाका लावलाय.
- पालघर येथील शासकीय रुग्णालयाचं अद्यायवत नुतनीकरण
- सूर्या नदीवरील मासवण येथील नवीन पुलाचे काम प्रगतीपथावर
- शेतकऱ्यांच्या कृषी माल साठवणुकीसाठी अत्याधुनिक कोल्ड स्टोरेज 
- पालघर शहरातील गटारे ,रस्ते ,शुशोभिकरण यासाठी भरीव निधी दिल्याचा दावा
- सातपाटी –मुरबे- वडराई एडवण या बंदराच्या विकासासाठी प्रयत्न,  आमदार निधीतून जेटीचे बांधकाम,  धुप नियंत्रण बंधारेचे बांधकाम
-शिरगाव आणि केळवा बीचच्या पर्यटन विकासासाठी भरीव निधी आमदार गावीत यांनी दिलीय.

आमदार गावित हे आपल्या निधीचा १०० टक्के वापर केल्याचा दावा केलाय. विधानसभा निवडणुकीत आपणच जिंकू हा विश्वास आमदार गावितांच्या बोलण्यातून दिसून येतोय. आमदारांनी विकास कामे केलीत, मात्र प्रत्यक्षात कामांची गुणवत्ता काय असा सवाल विरोधकांनी केलाय.

आमदार गावित विकासाचे दावे करत असले तरी समस्याही कायम आहेत.
- तारापुर एमआयडीसी क्षेत्रातील रासायनिक सांडपाण्याचा समुद्रात निचरा
- पालघर शहरात ट्राँफीकची मोठी समस्या, शहरातील बकालपणा कायम
- लोडशेंडीग,अनियमीत पाणीपुरवठा ,बेरोजगारी , जल प्रदुषण 
- सातपाटी सह अनेक बंदरात मोठ्या प्रमाणात गाळ 
- पर्यटन विकास होणे, मुलभुत सुविधांपासून वंचित

विकासकामे, समस्या आणि लोकसभा निवडणुकीनंतर बदललेली समीकरणं यामुळे निवडणूकीत धक्कादायक निकालाची अपेक्षा आहे. मतदारसंघावर काँग्रेसचा आमदार असला तरी स्थानिक स्वराज संस्थेतील शिवसेनेचे प्राबल्यही दुर्लक्ष करुन चालणार नाही. त्यामुळं पालघरची निवडणूक चुरशीची होणार याचे संकेत मिळतायत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.