जोगेश्वरीत मराठी मत विभागणीचा फटका

जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून शिवसेनेचे रवींद्र वायकर दुस-यांदा विधानसभेवर जाण्यासाठी तयारीत आहेत. या मतदारसंघात पंचरंगी लढत होत असल्यामुळे मराठी मत विभागणीचा फटका शिवसेनेला बसू शकतो. 

Updated: Oct 7, 2014, 04:10 PM IST
जोगेश्वरीत मराठी मत विभागणीचा फटका title=

मुंबई : जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून शिवसेनेचे रवींद्र वायकर दुस-यांदा विधानसभेवर जाण्यासाठी तयारीत आहेत. या मतदारसंघात पंचरंगी लढत होत असल्यामुळे मराठी मत विभागणीचा फटका शिवसेनेला बसू शकतो. 

नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष आणि महापौरपदाच्या कार्यकाळात केलेल्या कामांच्या जोरावर शिवसेनेचे रवींद्र वायकरांनी २००९ मध्ये बाजी मारली होती. भाजपशी युती असती तर यावेळीही ते सहज निवडून आले असते. परंतु युती तुटल्यामुळं निवडून येण्यासाठी त्यांना झगडावं लागतंय. गेल्या पाच वर्षात रस्ते, पाणी सुविधांबरोबरच बाळासाहेब ठाकरे रूग्णालय सुरू करण्याचे श्रेय ते घेतायेत.

भाजपनं नगरसेविका आणि सुधार समिती अध्यक्षा उज्वला मोडक यांना मैदानात उतरवलंय. मोडक यांचाही इथं चांगला जनसंपर्क आहे. तर भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले राजेश शर्मा हे  काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. सेना - भाजपमधील मतविभागणीचा फायदा ते उचलण्याच्या प्रयत्नात आहेत. या मतदारसंघातील बहुसंख्य लोक झोपडपट्टीत राहतात. त्यांच्या समस्यांकडं विद्यमान आमदारांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप शर्मा करतायत.

नगरसेवक भालचंद्र आंबुरेही इथून मनसेच्या तिकीटावर मैदानात उतरलेत. राष्ट्रवादीचे उमेदवार दिनकर तायडेही इथून रिंगणात आहेत. त्यामुळं या पंचरंगी लढतीत शिवसेनेचे रवींद्र वायकर जागा राखण्यात यशस्वी होतात की मराठी मतविभागणीचा फटका बसतो. हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.