३५ लाखांची फसवणूक : महेश मोतेवार फरार घोषित

समृद्ध जीवन या कंपनीचा मालक महेश मोतेवार उस्मानाबाद जिल्हयातील मुरूम पोलिसांच्या रेकॉर्डला फरार आरोपी असल्याचे उघड झाले आहे. त्याने ३५ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आलाय.

Updated: Dec 23, 2015, 05:48 PM IST
३५ लाखांची फसवणूक : महेश मोतेवार फरार घोषित title=

मुंबई : समृद्ध जीवन या कंपनीचा मालक महेश मोतेवार उस्मानाबाद जिल्हयातील मुरूम पोलिसांच्या रेकॉर्डला फरार आरोपी असल्याचे उघड झाले आहे. त्याने ३५ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आलाय.

न्यायालयाच्या आदेशावरून मोतेवारवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, त्याला पोलिसांनी फरार घोषित असल्याचे समोर आले आहे.

डेअरी प्रकल्पमध्ये भागीदारी देण्याचे अमीष दाखवून ३५ लाख रूपयांना फसवल्याप्रकरणी २०१२ मध्ये उमरगा कोर्टाच्या आदेशाने मोतेवारविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. 

राज्यात खुलेआम फिरणारा महेश मोतेवार मात्र उस्मानाबादच्या पोलिसांना सापडत नाही. त्यामुळे मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.