पिंपरी चिंचवड : प्रभाग रचनेवरून प्रचंड गोंधळ झाला. त्याच गदारोळात रचना जाहीर झाली. ही प्रभाग रचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पथ्यावर पडल्याचं दिसून येतंय. निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीच्या काही जागा डोळे बंद करून निवडून येणार हे स्पष्ट झाल्याने भाजपसाठी लढाई थो़डीशी अवघड झालीय.
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी बहुचर्चित प्रभाग रचना जाहीर झाली. प्रभाग रचना कोणाच्या सांगण्यावरून झाली हा वादाचा मुद्दा असला तरी जी रचना झाली ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या पथ्यावर पडणारी आहे हे स्पष्ट होतंय. काही प्रभाग राष्ट्रवादी काँग्रेससाठी एवढे फायदेशीर झालेत की प्रभागातल्या चारही जागा डोळे झाकून निवडून येऊ शकतात. निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादी 40 जागा सहज जिंकू शकते हे प्रभाग रचनेवरून स्पष्ट झालंय.
एकीकडे राष्ट्रवादीचा आत्मविश्वास वाढला असला तरी भाजप आमदार आणि शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्या चिंचवड मतदारसंघात जवळपास 52 जागा आहेत. त्यावर त्यांची पकड आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी आव्हान निर्माण करण्याचा दावा भाजप करत आहेत. प्रभाग रचना राष्ट्रवादीच्या पथ्यावर असेल पण अखेरीस मतदार हाच राजा असतो. त्यामुळे अंतिम क्षणी तो काय विचार करतो हे महत्त्वाचं असेल.
पाहा व्हिडिओ