ठाण्यात ८० वर्ष जुनी पाईपलाईन पुन्हा एकदा फुटली!

ठाण्यात एक पाईपलाईन फुटल्यानं लाखो लीटर पाणी वाया जाताना दिसतंय. 

Updated: Jul 28, 2016, 02:19 PM IST
ठाण्यात ८० वर्ष जुनी पाईपलाईन पुन्हा एकदा फुटली! title=

ठाणे : ठाण्यात एक पाईपलाईन फुटल्यानं लाखो लीटर पाणी वाया जाताना दिसतंय. 

ठाण्यातील वर्तक नगर परिसरात मुंबई महानगर पालिकेची तानासा धरणावरून मुंबईला पाणी पुरवठा करणारी ही पाईपलाईन आहे. जवळपास ८० वर्षांपूर्वीची ही पाईपलाईन असून तिचा व्यास १८०० मिलीमीटर आहे. 

उल्लेखनीय म्हणजे, ही पाईपलाईन याच ठिकाणी फुटण्याची ही काही पहिली वेळ नाही... याआधीही अनेक वेळा ही जुनी पाईपलाईन फुटूनदेखील प्रशासनाचं लक्ष याकडे गेलेलं नाही, हे विशेष.


पाईपलाईन फुटली

यामुळे, परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केलीय. या पाईपलाईनला दुरुस्त करण्यासाठी पाण्याचा दाब कमी होण्याची प्रतिक्षा मुंबई महानगरपालिकेचे पाणी पुरवठा करणारे कर्मचारी करत आहेत.

दरम्यान, ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन आणि मुंबई महानगर पालिका पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले असून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झालीय.  या प्रकारामुळे मुंबईला होणाऱ्या पाणी पुरावठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जातेय.