भिवंडीत पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ९ लाख रुपये जप्त

येत्या  24 मे ला भिवंडी महानगर पालिकेची निवडणूक होतेय. या निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचार जोरदार सुरु आहे 

Updated: May 14, 2017, 09:22 PM IST
भिवंडीत पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ९ लाख रुपये जप्त title=

भिवंडी : येत्या  24 मे ला भिवंडी महानगर पालिकेची निवडणूक होतेय. या निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचार जोरदार सुरु आहे 

निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने जागोजागी बंदोबस्तासाठी पोलीस तैनात केलेले आहे. रस्त्या रस्त्यावर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात नाकाबंदी सुरु आहे. वाहनांची तपासणीही सुरु आहे. 

या तपासणीदरम्यान, भिवंडी पोलिसांनी ४ वाहनांची तपासणी करून तब्बल 9 लाख रुपयांची रोकड जप्त केलीये.