टँकरच्या धडकेत बाईकस्वार जागीच ठार, नागरिकांचा रास्ता रोको

विरारमध्ये एका पाण्याच्या टँकरच्या धडकेत एका बाईकस्वाराला जागीच जीव गमावावा लागलाय.

Updated: Nov 4, 2016, 10:36 PM IST
टँकरच्या धडकेत बाईकस्वार जागीच ठार, नागरिकांचा रास्ता रोको  title=

विरार : विरारमध्ये एका पाण्याच्या टँकरच्या धडकेत एका बाईकस्वाराला जागीच जीव गमावावा लागलाय.

विरार चंदनसार रोडवर ही घटना घडली. शरद देवराम पाटील (२७ वर्ष) अशी मृत व्यक्तीची ओळख पटलीय. 

पोलिसांचा लाठीचार्ज...  

या घटनेनंतर स्थानिकांनी टँकर मालक आणि चालकाला तात्काळ अटक व्हावी, अशी मागणी करत रास्ता रोको केलाय. ही गर्दी हटवण्यासाठी घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी रहिवाशांवर सौम्य लाठीचार्जही केलाय. संतप्त नागरिकांना पांगवण्यासाठी पोलिसांना हा सौम्य लाठीचार्ज करावा लागलाय.

मृतदेह चार तास रुग्णवाहिकेतच...

या दरम्यान, रास्तारोकोमुळे शरद पाटील यांचा मृतदेह तब्बल ४ तास रुग्णवाहिकेमध्ये ठेवण्यात आला होता. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पोलिसांनी मृतदेह पाटील यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला.