दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अभिनेता अक्षय कुमारची थेट मदत

हिंदी चित्रपट सृष्टीतील नवा सुपरस्टार अक्षय कुमार याने दुष्काळग्रस्तांनाही मदतीचा हात पुढे केला.  

Updated: Dec 29, 2015, 11:14 PM IST
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अभिनेता अक्षय कुमारची थेट मदत title=

उस्मानाबाद : हिंदी चित्रपट सृष्टीतील नवा सुपरस्टार अक्षय कुमार याने दुष्काळग्रस्तांनाही मदतीचा हात पुढे केला. त्यांने थेट त्यांच्या बॅंक खात्यात ५० हजार रुपये जमा केलेत.

अक्षयने उस्मानाबाद जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयाना प्रत्येकी ५० हजारांची मदत केली. त्याने स्थानिक पातळीवरून ३० शेतकऱ्यांची निवड करून त्यांना थेट धनादेशाच्या माध्यमातून बॅंकामध्ये पैसे जमा केलेत. याआधी अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील २० शेतकऱ्यांना आतापर्यंत मदत पोहोचली असून दहा जणांना काही तांत्रिक अडचणींमुळे ती मिळालेली नाही. मात्र त्यांनाही ही मदत लवकरच मिळणार असल्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी सांगितले. नांगरे पाटील यांच्याबरोबर झालेल्या चर्चेतून अक्षय कुमार याने ही मदत दिलेय. 

सामाजिक बांधिलकी जपत अक्षय कुमारने मदतीचा हात पुढे केला. दरम्यान, उर्वरित १० शेतकरी कुटुंबीयांचे राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये खातेच नसल्याने ती रक्कम त्यांना देता आलेली नाही. बॅंकेचे खाते उघडल्यानंतर संबंधित कुटुंबांना ही मदत देण्यात येणार आहे.