Teasing: त्याच्यामुळे अल्पवयीन मुलीनं केली आत्महत्या

औरंगाबादमधील छेडछाडीला कंटाळून तरुणीच्या आत्महत्येची घटना ताजी असतांनाच अकोला जिल्ह्यातही असाच प्रकार घडलाय. जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात असलेल्या जलालाबाद इथं एका विद्यार्थिनीनं विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली. 

Updated: Sep 7, 2015, 09:11 AM IST
Teasing: त्याच्यामुळे अल्पवयीन मुलीनं केली आत्महत्या title=
प्रातिनिधिक फोटो

अकोला: औरंगाबादमधील छेडछाडीला कंटाळून तरुणीच्या आत्महत्येची घटना ताजी असतांनाच अकोला जिल्ह्यातही असाच प्रकार घडलाय. जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात असलेल्या जलालाबाद इथं एका विद्यार्थिनीनं विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली. 

आणखी वाचा - सेक्स नकली, पोलिस नकली, गंडा मात्र लाखोंचा

ही विद्यार्थिनी दहाव्या वर्गात शिकत होती. काही दिवसांपासून गावातील तीन युवक तिची छेड काढत होते. सुरुवातीला तिनं याकडे दुर्लक्ष केलं. हा त्रास असह्य झाल्यानं शनिवारी रात्री उशिरा तिनं गावातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. 

आणखी वाचा - महिला अधिकाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा

रविवारी दुपारी युवतीवर अंतिमसंस्कार करण्यात आले. शवविच्छेदन अहवालानंतर पोलीस पुढील कारवाई करणार आहेत. दरम्यान, छेड काढणाऱ्या युवकांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी तिच्या कुटुंबियांनी केली आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.