जयेश जगड, झी मीडिया, अकोला : अकोल्यात तरुणाच्या लैंगिक शोषण प्रकरणी फरार असलेले निरंजनकुमार गोयंका आणि जुगलकिशोर रुंगठा अखेर शरण आले.
निरंजनकुमार गोयंका आणि जुगलकिशोर रुंगठा... अकोल्यातल्या तरुणाच्या लैंगिक शोषण प्रकरणातले आरोपी... तब्बल ४० दिवसांपासून अकोला पोलिसांच्या हातावर तुरी देत फरार असणारे हे आरोपी अखेर शरण आलेत... निरंजनकुमार गोयंका भारतीय सेवा सदन संस्थेचे माजी अध्यक्ष होते तर जुगलकिशोर रुंगठा माजी सचिव आहेत... संस्थेच्या राधादेवी गोयंका महिला महाविद्यालयात संबंधित तरुण सात वर्षांपासून रोजंदारीवर काम करतोय. नोकरीत कायम करण्याचं आमिष दाखवून दोघांनी लैंगिक छळ केला.... गेली सात वर्ष हा घृणास्पद प्रकार सुरू होता.
तरुणानं स्टिंग ऑपरेशनद्वारे ५ जुलैला पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाचा भंडाफोड केला...७ जुलैला गोयंका आणि रुंगठाविरोधातत अनैसर्गिक बलात्काराचे गुन्हे दाखल करण्यात आले...१७ जुलैला दोन्ही आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला...तर १० ऑगस्टला हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानंही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला....अखेर १७ ऑगस्टला दोन्ही आरोपी पोलिसांसमोर शरण आले....
दोन्ही आरोपींच्या शरणागतीनंतर या प्रकरणातील आणखी काही तथ्य समोर येण्याची शक्यताय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.