एटापल्ली : दूर्गम भागातील आरोग्य सेवचं दाहक वास्तव समोर आलंय. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली या अतिदूर्गम तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात एका मुलाचा मृत्यू झाला. रुग्णालयातील डॉक्टरांनी कुटुंबियांना मृतदेह घेऊन जाण्यास रुग्णवाहिका देण्यास नकार दिला. हताश झालेल्या पित्यानं आपल्या बाळाचा मृतदेह खांद्यावर घेऊन पाच किलोमीटरची पायपीट करत घर गाठलं.
डॉक्टरांच्या आठमुठ्या भूमिकेमुळे एका आदीवासी कुटुंबाला मनस्ताप सहन करावा लागला. संदीप पोटामी असं मृत मुलाचं नाव आहे. तो जन्माने मुकबधीर होता. तो जन्माने मुकबधीर होता. एटापल्ली तालुक्यातील तुमरगुडा या गावी तो आपल्या कुटुंबासह राहत असे. १२ जानेवारी रोजी त्याच्या पोटात दुखू लागले. कुटुंबीयांनी संदीपला एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
मात्र दाखल असतानाच त्याला डायरिया झाल्याचे निदान झाले. डॉक्टरानी उपचार सुरु केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह गावी नेण्यासाठी कुटुंबीयांनी वाहनासाठी विनंती केली मात्र वाहन रुग्णवाहिका देण्यास नकार दिला गेला. संकट कोसळल्यावरही धीर तोंदे पोटामी या त्याच्या पित्याने संदीपचा मृतदेह थेट खांद्यावर घेतला आणि रात्रीच्या अंधारात थेट ५ किलोमीटर चालत गाव गाठले.