अण्णा हजारे यांना 'झेड प्लस' सुरक्षा, दुसऱ्यांदा धमकी

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना येणाऱ्या धमकीनंतर 'झेड प्लस' सुरक्षा पुरविण्यात आली आहे. अण्णांना दुसऱ्यांना धमकी देण्यात आली आहे. त्यानंतर ही सुरक्षा वाढविण्यात आली.

Updated: Aug 21, 2015, 11:39 AM IST
अण्णा हजारे यांना 'झेड प्लस' सुरक्षा, दुसऱ्यांदा धमकी title=

राळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना येणाऱ्या धमकीनंतर 'झेड प्लस' सुरक्षा पुरविण्यात आली आहे. अण्णांना दुसऱ्यांना धमकी देण्यात आली आहे. त्यानंतर ही सुरक्षा वाढविण्यात आली.

गुरूवारी अण्णांना जीवे मारण्याच्या धमकीचे आणखी एक पत्र आले होते. मी शार्पशूटर असून तुमची सुपारी घेतली आहे, अशा आशयाची धमकी या हिंदी मजकुरातून पत्रातून देण्यात आली. काही दिवसात आपण माझ्या हातून सुटणार नाही, कारण मी तुमची सुपारी घेतली आहे, असा मजकूर या पत्रात आहे. या धमकीनंतर पारनेर पोलिसांत तक्रार देण्यात आली होती. 

याआधी अण्णांना एक धमकीचे पत्र मिळाले होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापासून दूर रहा अन्यथा तुमचा दाभोलकर करू, अशी धमकी अण्णांना देण्यात आली होती.

अण्णांचे वकील मिलिंद पवार यांनी अण्णांना झेड प्लस सुरक्षा मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. त्यानंतर आता पुन्हा अण्णांना धमकी देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.