अखेर युतीवर शिक्कामोर्तब, सेना ६४ तर भाजप ४९ जागा लढवणार

औरंगाबाद महापालिका निवडणुकांसाठी अखेर युतीचं घोडं गंगेत न्हालंय. कारण शिवसेना आणि भाजपमध्ये युती होणार आहे. शिवसेना ६४ तर भाजप ४९ जागा लढवणार आहे. याबाबतची औपचारिक घोषणा आज होणार असल्याची माहिती शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिलीय.

Updated: Apr 6, 2015, 08:59 AM IST
अखेर युतीवर शिक्कामोर्तब, सेना ६४ तर भाजप ४९ जागा लढवणार title=

औरंगाबाद: औरंगाबाद महापालिका निवडणुकांसाठी अखेर युतीचं घोडं गंगेत न्हालंय. कारण शिवसेना आणि भाजपमध्ये युती होणार आहे. शिवसेना ६४ तर भाजप ४९ जागा लढवणार आहे. याबाबतची औपचारिक घोषणा आज होणार असल्याची माहिती शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिलीय.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सुद्धा भाजप नेत्यांची बैठक घेतली आणि युती होणारच असे सांगितलं होतं.  अखेर रविवारी रात्री उशिरा युतीबाबत शिक्कामोर्तब करण्यात आलंय. 

औरंगाबादमधून पुढं आलेलं एमआयएमचं आव्हान आणि नवी मुंबईतील राष्ट्रवादीचा प्रभाव यामुळं शिवसेना भाजप पुन्हा एकत्र येतील, असा अंदाज वर्तवण्यात येत होता.  मागील अनेक दिवसांपासून दोन्ही महापालिका निवडणुकीत युती व्हावी यासाठी शिवसेना आणि भाजप नेत्यांच्या बैठका सुरु होत्या. मात्र सर्व बैठका तोडग्याविनाच संपल्या मात्र काल झालेल्या बैठकीत भाजप-सेना युतीबाबत निश्चित झालंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.