भारतीय तरुणाची सौदी अरेबियात गोळ्या झाडून हत्या

बाणकोटच्या तरुणाची सौदीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. रत्नागिरीच्या बाणकोटमधीलम्हसब आबा परमार असं या तरुणाचं नाव आहे. ही घटना ४ सप्टेंबरच्या रात्री  घडली.

Updated: Sep 6, 2016, 11:37 PM IST
भारतीय तरुणाची सौदी अरेबियात गोळ्या झाडून हत्या title=

रत्नागिरी : बाणकोटच्या तरुणाची सौदीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. रत्नागिरीच्या बाणकोटमधीलम्हसब आबा परमार असं या तरुणाचं नाव आहे. ही घटना ४ सप्टेंबरच्या रात्री  घडली.

सौदी अरेबियातील अल-खोबरमधील एका शेख कुटुंबाकडे म्हसब परकार हा ४ वर्षांपासून ड्रायव्हरचं काम करत होता. मालक आणि म्हसबमध्ये काही कारणांवरून वाद निर्माण झाला. 

या वादानंतर मालकाच्या मुलाने म्हसबवर ३ गोळ्या झाडल्या आणि त्यातच म्हसबचा मृत्यू झाला, यानंतर आरोपीने पोलिसांसमोर शरणागती पत्करली.

 दरम्यान, म्हसबचं मे महिन्यात लग्न ठरवण्यात आलं होतं. मात्र आता म्हसबची सौदीत हत्या झाल्याने बाणकोट परिसरात शोककळा पसरली आहे.  

म्हसबचे वडील आबा परकार आणिआई निशाद परकार बाणकोट इथं राहतात.म्हसबचा भाऊ मझर परकार हा नोकरीनिमित्त दुबईत असतो.

भारतीय दूतावासने या घटनेची दखल घेतली आहे, सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून म्हसबचा मृतदेह लवकरात लवकर भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x