बारामती : प्रचारात मोदी सरकारवर सडकून टीका करणाऱ्या शरद पवारांची निकाल हाती आल्यावर वाणीच बदलून गेलीय. आधी भाजपला बिनशर्त पाठींबा देऊ करणाऱ्या पवारांनी आता मोदी सरकारचं कौतुक करायला सुरूवात केलीय.
‘मोदी सरकार बरच काही करणार असं दिसतंय’ असं पवार म्हणतायत. या सरकारला काम कऱण्यासाठी वेळ द्यायला हवा, असंही मत शरद पवारांनी व्यक्त केलंय. ते बारामतीमध्ये बोलत होते.
केंद्रात काम करण्यासाठी जो संच असावा लागतो तो या सरकारमध्ये नाही मात्र या सरकारला थोडा संधीही दिली पाहीजे असं ते म्हणतात. मोदी सरकारचे गोडवे गाऊन आता पवार कोणती खेळी खेळत आहेत याची उत्सुकता आहे.
व्हिडिओ पाहा -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.