सापांची मिरवणूक - नागांच्या स्पर्धेसाठी हवीय परवानगी!

सांगली जिल्ह्यातलं बत्तीस शिराळा गाव... इथल्या नागपंचमीच्या उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे.

Updated: Jul 3, 2015, 07:44 PM IST
सापांची मिरवणूक - नागांच्या स्पर्धेसाठी हवीय परवानगी! title=

सांगली : सांगली जिल्ह्यातलं बत्तीस शिराळा गाव... इथल्या नागपंचमीच्या उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे.

नागपंचमीला गावामध्ये जिवंत नाग पकडून पाहूणचार केला जात होता... सापांची मिरवणूक आणि उंच नागांच्या स्पर्धाही घेतल्या जायच्या... मात्र २००२ पासून प्राणीमित्र आणि सर्प प्रेमींच्या विरोधामुळे इथल्या उत्सवावर काही प्रमाणात मर्यादा आल्या. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार जिवंत सापांना पकडणं, त्यांचा खेळ करणं तसंच मिरवणूक काढणं, प्रदर्शन करणं त्यांच्या स्पर्धा भरवण्याला पूर्णपणे बंदी आली. 

पण बत्तीस शिराळामधल्या नागपंचमीला हजारो वर्षांची परंपरा असून तो श्रद्धेचा भाग म्हणून परवानगी द्यावी अशी मागणी नागरिकांनी केलीय. 

बत्तीस शिराळ्याच्या नागरिकांनी जिवंत नागाच्या पूजेला मान्यता मिळावी यासाठी बेमुदत बंद आंदोलन सुरू केलंय. त्यासाठी गावातले सर्व व्यवहार ठप्प आहेत. आंदोलक साखळी उपोषण करतायत. त्यामुळे सरकार यासंदर्भात काही निर्णय घेणार का? याकडे बत्तीस शिराळ्यातल्या नागरिकांचं लक्ष लागलंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.