पतीच्या मित्रांना शरीरसुख नाकारले, पतीने विवाहितेस पेटवले

दारुड्या पतीच्या मित्रांना शरीरसुख नाकारणाऱ्या पत्नीला पतीने मित्रांच्या मदतीने पेटवून दिल्याची घटना २९ जून रोजी घडली. किशोर काकड असे या दारुड्या नराधमाचे नाव आहे. किशोर याच्या व्यसनासाठी त्याचे मित्र पैसे देत होते. त्याचा मोबदला म्हणून पत्नीला आपल्या मित्रांसोबत शरीर संबंध ठेवण्यास सांगितले. 

Updated: Jul 3, 2015, 07:17 PM IST
पतीच्या मित्रांना शरीरसुख नाकारले, पतीने विवाहितेस पेटवले

अकोट : दारुड्या पतीच्या मित्रांना शरीरसुख नाकारणाऱ्या पत्नीला पतीने मित्रांच्या मदतीने पेटवून दिल्याची घटना २९ जून रोजी घडली. किशोर काकड असे या दारुड्या नराधमाचे नाव आहे. किशोर याच्या व्यसनासाठी त्याचे मित्र पैसे देत होते. त्याचा मोबदला म्हणून पत्नीला आपल्या मित्रांसोबत शरीर संबंध ठेवण्यास सांगितले. 

त्या रात्री पीडित महिला आपल्या दीड वर्षांच्या चिमुकल्यासोबत घरी एकटीच होती. पीडितेचा पती मजुरी करतो. त्याला दारूचे व्यसन आहे. तो आणि त्याचे दोन मित्र संतोष मोरे, रामसिंग हे घरी आले. ते दारू पिऊन होते. त्यामुळे झोपण्यासाठी ती दुसऱ्या खोलीत निघाली. मात्र, किशोरच्या मित्रांनी या २५ वर्षीय विवाहितेसोबत लैंगिक संबंध स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली.

महिलेने स्पष्ट नकार देऊन ही बाब पतीला सांगितली. मात्र, पतीनेसुद्धा तिला मित्रांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास सांगितले. त्यानंतर तिने कडक शब्दांत पतीला फटकारले. त्यामुळे चवताळलेल्या या तिघांनीही तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जिवंत पेटवून दिले. यामध्ये ही महिला ८३ टक्के भाजली. 

शेजारच्यांनी तिला सर्वप्रथम अकोटच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिला अकोला येथील सर्वोपचारमध्ये हलवण्यात आले. सध्या ती मृत्यूशी झुंज देत आहे. तिचा मृत्यूपूर्व जबाब, वैद्यकीय अहवालावरून अकोट शहर पोलिसांनी जुलै रोजी पीडित महिलेचा पती किशोर काकड संतोष मोर, रामसिंग यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३०७, ३५४, नुसार गुन्हा नोंदवला. किशोर काकडला पोलिसांनी आज अटक केली आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.