जत्रेत 25 ते 30 भाविकांवर मधमाशांचा हल्ला

 या जखमी भविकांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 16, 2017, 04:40 PM IST
जत्रेत 25 ते 30 भाविकांवर मधमाशांचा हल्ला title=

सातारा : सातारा जिल्ह्यातील शिवाजीनगर येथे शिलोबा देवाच्या यात्रेला गेलेल्या अनेक 25 ते 30 भाविकांवर मधमाश्यांनी हल्ला केला आहे. यात्रेनिमित्त सकाळी शिलोबा डोंगरावर देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी भाविक गेले असताना अचानक या भविकांवर आग्या मोहोळाच्या माशांची हल्ला चढवला. 

यामुळे घाबरलेले भाविक सैरावैरा पळत होते, यामुळे अनेक भाविक जखमी झाले आहेत. या जखमीमध्ये  महिलाचा आकडा जास्त आहे. या जखमी भविकांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.